हाजारो लोकांचे पोट भरणारे हात मदतीच्या प्रतीक्षेत....

vadhpi.jpg
vadhpi.jpg

हडपसर (पुणे) : एके काळी लग्नाच्या समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमात महिलांसह पुरूष मंडळीं स्वयंपाकी म्हणून काम करीत होत्या. आज या मजूर वर्गावर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे. शहरासह ग्रामीण भागात हजारोंच्या संख्येने दरवर्षी लग्न होत असतात. यामध्ये सर्वात जास्त काम करणारा मजूर वर्ग मात्र मंगल कार्यप्रसंगी पडद्याआड असतो. लग्नासह इतर समारंभात हजारो लोकांचा स्वयंपाक तयार करण्याचे काम हा मजूरवर्ग करीत असतो. या मजूर वर्गाची साधी नोंद सुध्दा शासन दरबारी आढळून येत नाही. कारण त्यांच्या विषयी सरकारने आता पर्यत विचारच केला नाही. त्यातही अशा धकाधकीत दोन वेळचे जेवनही त्याच्या नशिबी नसते. ज्यांच्यामुळे लग्नात लोक जेवण करीत होते. त्या मजूर वर्गावर आता उपासमारीची वेळ आली आहे.


केटरिंग व्यावसायिक रामकृष्ण जाधव म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाने स्वागत सोहळे, लग्न, समारंभ, सार्वजनिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो लोकांच्या जेवणावळी उठविणारे कॅटरिंग, मंडप या व्यवसायात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कार्यरत असलेल्या व्यावसायिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या रूग्णांत सतत वाढ होत असल्याने येत्या काळातही समारंभ होण्याची शक्यता धूसर आहेत. सीझन असल्याने अनेकांनी लाखो रूपयांची खरेदी केली होती, परंतु, आवक बंद झाल्याने निराशा झाली आहे, शिवाय बाहेर राज्यातील आचारी व कामगार परत गेले आहेत. त्यामुळे टाळेबंदीचा फटका मंडप, मंगलकार्यालय व कॅटरिंग व्यवसायाला बसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


मंडप डेकोरेटर संजय भोसले म्हणाले, हंगामासाठी बनविलेले साहित्य, मजूरांना दिलेली अगाउ रक्कम, बॅंकेचे कर्जाचे हप्ते अशा अनेक संकटांना मंडप डेकोरेशन चालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देणे आवश्यक आहे. वर्षभर कामे नसल्याने संकट ओढावले आहे. कामगारही अडचणीत आहेत. त्यामुळे शासनाने योग्य ती मदत करावी. मंगल कार्यालय, वाजंत्री पथक, छायाचित्रकार, सुवर्ण अलंकार, कॅटरिंग, कापड व्यवसाय, बांगडी व्यवसाय, फर्निचर, गादी व्यवसाय, फुलांचा व्यवसाय, वरातीकरिता प्रवासी वाहने, लग्नात सुगमसंगीताचा कार्यक्रम सादर करणारे कलावंत, फटाका व्यावसायिक यांना फार मोठा फटका बसला आहे.\


केटरिंग व्यवसायिक सलील वाळके म्हणाले, लॉकडाउनच्या काळात विविध कार्यक्रमासाठी घेतलेल्या आर्डर रद्द झाल्या आहेत. काहींनी समोरच्या तारखा घेतल्या तर काहींना पूर्ण अॅडव्हान्स परत करावा लागला. त्यामुळे सिजनच्या सुरूवातीलाच मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हा फटका केवळ कॅटरिंग व्यवसायिकांनाच नाही तर त्यावर अवलंबून असणारे वाढपी, मजूर इ. यांना ही मोठा फटका बसला आहे. सध्या कुणी कोरोनामुळे रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याने आणखी किती दिवस हे चालेल हे सांगणेही कठिण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com