डिजिटल लग्नपत्रिकेचा वाढतोय ट्रेंड; फोटो, व्हिडिओ इन्व्हिटेशनला पसंती

The growing trend of digital wedding Invitation by photo and video
The growing trend of digital wedding Invitation by photo and video

सातगाव पठार : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातला महत्वाचा घटक, परंतु मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने सोहळा पार पाडावा लागत आहे. त्यामुळे लग्नाचे निमंत्रण, लग्नसोहळा तसेच स्वागत समारंभाचे आमंत्रण देण्यासाठी कागदी लग्नपत्रिकेऐवजी डिजिटल ऑनलाईन लग्नपत्रिका असा ट्रेंड वाढतो आहे. फोटो इन्व्हिस्टेशन, व्हिडिओ इन्व्हिटेशन असे निमंत्रणाचे नवे प्रकार बदलत्या काळानुसार पुढे आले आहेत. त्यामुळे पारंपारिक कागदी लग्नपत्रिका छापण्याची पध्दतच कालबाह्य होतेय की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना काळात टाळेबंदी झाल्याने अनेक समारंभांवर मर्यादा आल्या. समूह संसर्गाची भीती लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर आजही निर्बंध आहेत. फक्त 50 माणसांच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्यास परवानगी आहे. मात्र लग्न म्हटले, की आकर्षक लग्नपत्रिका, देवदेवतांची छायाचित्रे, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावांची लांबलचक यादी, निमंत्रक, कार्यवाहक, स्वागतोत्सुक असे सर्व वेगवेगळे रकाने पत्रिका व्यापून टाकतात अन् यात कुणाचे नाच टाकायचे राहिलेच तर नाराजीच्या रूसव्या-  फुगव्याचा पाढा वेगळाच. मात्र आता कोरोनाकाळात कागदी लग्नपत्रिका हद्दपार होताना दिसून येत आहे. याला पर्याय म्हणून डिजिटल लग्नपत्रिकेची संकल्पना पुढे येत आहे.

फोटो इन्व्हिटेशनमध्ये वर-वधू छायाचित्रे, नाव, विवाह तारीख व स्थळ इतकाच मजकूर डिझाईन करून बाकीच्या गोष्टींना लग्नपत्रिकेतून फाटा दिला जात आहे, तसेच व्हिडिओ इन्व्हिटेशनमध्ये विविध ग्राफिक्सचा, गीतांचा वापर करीत 30 सेकंदांचे आकर्षक व्हिडिओ बनविले जात आहेत. हे व्हिडिओ स्टेटसला ठेवणे, तसेच फेसबुकवरून शेअर कले जात आहेत. इन्व्हिटेशन व्हॉट्सॲपवर पाठवत लग्नाचे निमंत्रण दिले जात आहे. यामुळे थेट भेट घेऊन लग्नपत्रिका देणे टाळले जात असल्याने कोरोना संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे. मित्रांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हे इन्व्हिटेशन फॉरवर्ड केल्याने वेळ आणि पैसे वाचत आहेत. या निमंत्रणासह कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य होत असल्याचे भावनिक खेद संदेशही पाठविले जात आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशअर्जास मुदतवाढ 

सध्या कोरोनामुळे विवाह समारंभांवर मर्यादा आल्याने पारंपारिक पध्दतीने छापल्या जाणाऱ्या कागदी लग्नपत्रिका कोणीही छापत नाही. सर्वजण फक्त डिजिटल पध्दतीच्या लग्नपत्रिका बनविण्याची मागणी करत आहेत. 
- गणेश गायकवाड, छपाई व्यवसायिक, पेठ ता.आंबेगाव

कोरोना संकटामुळे छपाई व्यवसायाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. छपाई व्यवसायिकांचे संपूर्ण वर्षाचे नियोजन लग्नसीझनवर अवलंबून असते. मात्र सध्या लग्नसमारंभांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे 1000 ते 2000 पत्रिका छापणारे कार्यमालक आता फक्त 10 ते 50 पत्रिकांची मागणी करत आहेत.  त्यामुळे लग्नपत्रिका छपाईमधून होणारा लाखो रूपयांचा धंदा बुडाला असल्याने ग्रामीण भागातील छपाई व्यवसायिक संकटात सापडले आहेत.
- सोमनाथ गोरे, संस्थापक अध्यक्ष, भिमाशंकर प्रिंटींग क्लस्टर पेठ, ता.आंबेगाव

- मुख्य बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com