पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्ट्रीट शॉपिंग’चा वाढतोय ट्रेंड

पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्ट्रीट शॉपिंग’चा वाढतोय ट्रेंड

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शॉपिंग मॉल उभे राहिले असले, तरी ‘स्ट्रीट शॉपिंग’ची क्रेझही वाढताना पाहायला मिळत आहे. पावसाळ्यातही हौशी नागरिकांमुळे शहरातील काही रस्ते गजबजलेले आहेत.

मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ‘स्ट्रीट शॉपिंग’ संस्कृती चांगलीच रुजली आहे. त्याप्रमाणेच आता पिंपरी-चिंचवडमध्येही वल्लभनगर, पिंपरी कॅम्प बाजारपेठ, शगून चौक, साई चौक, कस्तुरी मार्केट, चिखलीतील साने चौक, भोसरी-आळंदी रस्ता, लांडगे नाट्यगृह परिसर, पुणे-नाशिक महामार्ग, चांदणी चौक, डांगे चौक आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर ही संस्कृती रुजू लागली आहे. 

पूर्वी ‘स्ट्रीट शॉपिंग’ म्हटले की ‘लो स्टेट्‌स’ असा शिक्का मारला जायचा. मात्र, आता त्याच्याकडे बदलती संस्कृती या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आहे. स्वाभाविकच ‘स्वस्तात मस्त’ शॉपिंग होत असल्याने अनेक जण ‘स्ट्रीट शॉपिंग’ला पसंती देऊ लागले आहेत. अर्थातच, मॉल अथवा दुकानांमध्ये कितीही ‘डिस्काउंट’ दिले जात असले, तरी ‘स्ट्रीट शॉपिंग’ खिशाला परवडणारीच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

रोजगाराभिमुख संस्कृती
या ‘स्ट्रीट शॉपिंग’मुळे रोजगाराचा प्रश्‍नही काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. शहरात दहा टक्‍क्‍यांच्या आसपास विक्रेते आहेत. अनेकांचा त्यातून उदरनिर्वाह सुरू आहे. किंबहुना, मॉलमध्ये दीड ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळणारी वस्तू रस्त्यावर अवघ्या दोनशे-तीनशे रुपयांत मिळत असल्याने ग्राहकालाही समाधान मिळते. 

वाहतूक कोंडीची समस्या
असे असतानाही स्ट्रीट मार्केटमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक परिसरांमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. यासाठी हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोणताही सीझन असो, रस्त्यावर शॉपिंग करण्यात विशेष आनंद मिळतो. सध्या पावसाळी कपडे तसेच ज्वेलरी व शूज, रेनकोट, रंगीबिरंगी छत्र्यांची खरेदी आम्ही अशाच पद्धतीने करीत आहोत, असे वल्लभनगर येथील वसुंधरा माने यांनी सांगितले.

काही नागरिक अत्यंत चोखंदळ असतात. बऱ्याचदा रस्त्यावरील वस्तूंबाबत साशंक असतात. परंतु, हा मालदेखील बऱ्यापैकी गुणवत्तापूर्ण असतो. 
- सुशील खत्री, विक्रेता, पिंपरी कॅम्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com