पुणे विभागात 32 हजार 363 कोटींचा जीएसटी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे : "एक देश, एक कर' ही घोषणा देत "वस्तू व सेवा कर' (जीएसटी) देशभरात लागू होऊन 31 जूनला एक वर्ष पूर्ण झाले. 2017-18 या वर्षभरात या करातून पुणे विभागात 32 हजार 363 कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला. 

पुणे : "एक देश, एक कर' ही घोषणा देत "वस्तू व सेवा कर' (जीएसटी) देशभरात लागू होऊन 31 जूनला एक वर्ष पूर्ण झाले. 2017-18 या वर्षभरात या करातून पुणे विभागात 32 हजार 363 कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला. 

या संदर्भात पुणे विभागाच्या केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) उपआयुक्त राजलक्ष्मी कदम म्हणाल्या, ""एक वर्षामध्ये पुणे विभागात जवळपास 90 हजार 124 नवीन नोंदणी झाली आहे. जुलै 2017 ते जून 2018 अखेर एकूण 32 हजार 363 कोटींचे महसुली उत्पन्न मिळाले. पुणे विभागाने 36 टक्के महसुलीवाढीचे उद्दिष्ट गाठले आहे. आगामी वर्षामध्ये नव्याने नोंदणी करून घेणे, त्यांच्याकडून जीएसटी व विवरणपत्र वेळेत भरून घेतानाच ज्या त्या वेळेस येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. जीएसटी संदर्भात जनजागृती आणि कार्यशाळा हे देखील निरंतर सुरू राहणार आहेत.'' 
 

पुणे विभागाचा जीएसटी महसूल (एक जुलै 2017 ते 30 जून 2018) 
- पुणे विभागातील एकूण करदाते : एक लाख 35 हजार 299 
- केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) इंटिग्रेटेड वस्तू व सेवा कर (आयजीएसटी) आणि उपकर (सेस) : 22 हजार 268 कोटी रुपये 
- राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) :10 हजार 95 कोटी रुपये 
- एकूण जीएसटी महसुली उत्पन्न : 32 हजार 363 कोटी रुपये 

 

Web Title: GST of 32 thousand 363 crores in Pune division