अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

शहरातील चार ते पाच हजार गृहनिर्माण संस्थांना तीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

पुणे : सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने स्वागत केले आहे. शहरातील अन्य रस्त्यावरील सोसायट्यांबाबत असाच निर्णय घ्यावा, अशी मागणीही महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील सर्व विरोधी पक्षनेत्यांची बैठक उद्या (ता.१५) मुंबई येथे बोलविली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

- कॉंग्रेसच्या 'या' नेत्याला विधान परिषदेवर घ्या; कार्यकर्त्यांची मागणी!

शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली. त्यावरून महापालिकेतील राजकारण तापले आहे. या प्रस्तावात अनेक त्रुटी असून हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी मागणी महापालिकेतील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली होती. त्यावर नगर विकास विभाग, महापालिका आयुक्त, विरोधी पक्षाचे नेते यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्‍वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार उद्या मुंबई येथे ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

- अंत्यविधीसाठी करू नका धावपळ; 'मोक्ष सेवा' मिळणार एका कॉलवर!

दरम्यान महापालिकेने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रक काढले आहे. शहरातील चार ते पाच हजार गृहनिर्माण संस्थांना तीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्या संस्थांमधील बहुसंख्य सभासद हे वयोवृद्ध झाले असून त्यांच्या सदनिकेचा पुनर्विकास त्यांच्या हयातीत व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु गेली अनेक वर्ष सहा मीटर नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावरून चर्चा सुरू आहे. त्यावर ठोस निर्णय न झाल्याने हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्वच रस्त्यांवर गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासनासाठीचा फायदा होण्यासाठी आवश्‍यक तो निर्णय घ्यावा त्वरित घ्यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. 

- मागासवर्गीय, आदिवासी शेतकऱ्यांना 'या'साठी मिळणार अडीच लाखाचे अनुदान!

रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावावरून पालकमंत्री पवार विरोधी पक्षाबरोबरच जशी चर्चा करणार आहेत. तशीच बुधवारी ( ता. 17) रोजी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाबरोबरच देखील या विषयावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर 'दादा' काय निर्णय घेणार, त्यावर जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे भवितव्य ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Ajit Pawar has called a meeting of all the Opposition Leaders of PMC