esakal | गुढीपाडव्यातही ग्राहकांची हापूसकडे पाठ; अधिक दराचा परिणाम

बोलून बातमी शोधा

mango.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण नैवद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंबा खरेदी करतात

गुढीपाडव्यातही ग्राहकांची हापूसकडे पाठ; अधिक दराचा परिणाम
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण नैवद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंबा खरेदी करतात. मोठ्या प्रमाणात असलेल्या मागणीमुळे दरवर्षी शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होते. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हापूसची आवक कमी आहे. तसेच दरही जास्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंबा खरेदीकडे पाठ फिरविली आहे. शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाची भिती कायम आहे. त्याचाही आंबा विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. कोरोनाचा संसर्ग नसता आणि आवक मोठ्या प्रमाणात झाली असती, तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी केली असती. यंदा कोरोनाचे संकट पाहता ग्राहकांना घरपोच आंबे पोहचवण्याची व्यवस्था व्यापार्‍यांकडून करण्यात आली आहे. ग्राहकांनी मागणी केल्यास अगदी एक पेटी ग्राहकांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

फळबाजारात सोमवारी कोकणातून सुमारे 3 हजार पेट्याची आवक झाली. दरवर्षी पाडव्याला आंब्याच्या साडेचार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. तसेच व्यापारीही खास पाडव्यासाठी हापूस तयार करून ठेवत असतात. मात्र यंदा आवक कमी असल्याने व्यापार्‍यांकडेही तयार मालाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाऊक बाजारात पेटीचे, तर किरकोळ बाजारात डझनाचे दर अधिक आहेत. हे दर अनेकांना परवडणारे नाहीत. आवक जोपर्यंत वाढणार नाही, तोपर्यंत दर स्थिर राहतील असा अंदाजही मोरे यांनी व्यक्त केला.

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

कुटुंबात पाडव्याला पूजेसाठी आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी आमरस खाण्याची पद्धत आहे मात्र, यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  त्यामुळे १ हजार ते दीड हजार रुपये डझनप्रमाणे नागरिकांना आंबा खरेदी करावा लागत आहे. गेल्या वर्षी ५०० ते ७०० रुपये डझन आंब्याचे भाव होते, असं आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितलं.

पुन्हा ‘लॉकडाउन’? पुन्हा शेअर खरेदीची संधी?

दर्जानुसार घाउक बाजारातील हापूसचे दर

तयार 4 ते 10 डझन 3 ते 6 हजार
तयार 1 डझन 800 ते 1500 रूपये
कच्चा 5 ते 10 डझन 2.5 ते 5 हजार
कच्चा 4 ते 7 डझन 2 ते 3.5 हजार