esakal | अमृतवाहिनी शब्द सरींची...वसुंधरा वाहिनीवर एेका मिशन कोरोना... 
sakal

बोलून बातमी शोधा

vasundhara redio

कोरोनाचा ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या वसुंधरा वाहिनी व कम्युनिटी रेडिओ असोसिएशन व युनिसेफ यांच्या वतीने मिशन कोरोना ही मालिका सुरु करण्य़ात आली आहे.

अमृतवाहिनी शब्द सरींची...वसुंधरा वाहिनीवर एेका मिशन कोरोना... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाचा ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या वसुंधरा वाहिनी व कम्युनिटी रेडिओ असोसिएशन व युनिसेफ यांच्या वतीने मिशन कोरोना ही मालिका सुरु करण्य़ात आली आहे. काल योगदिनाचे औचित्य साधत या मालिकेचे वसुंधरा वाहिनीवरून प्रसारण सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रप्रमुख आशा मोरे यांनी दिली. 

जय शिवराय : राजगडावरील दुरुस्तीचे काम सुरू, पुरातत्व विभागाने घेतली दखल 

विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञानच्या माहिती विभागाचे संचालक डॉ. सतीशचंद्र जोशी यांनी वसुंधरा वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या या मालिकेचे प्रसारण देशातील150 हुन अधिक रेडिओ केंद्रांवर होत असल्याचे सांगितले. वसुंधरा वाहिनीवरून "मिशन कोरोना" ही मालिका दहा भागात प्रसारीत होणार असून, रविवारी सकाळी साडेनऊ आणि संध्याकाळी साडेसहा वाजता, तर पुनः प्रसारण गुरुवारी होईल.

 पुण्यातील दोन खासदार टाॅप फाईव्ह परफाॅर्मर 

ऑडिओ बुकप्रमाणे या दहा भागांच्या मालिकेद्वारे लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छतेचे महत्व, बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, गृहविलगीकरणामध्ये रुग्णाची काळजी, योग्य आहार आणि व्यायाम, त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास कोणाकडून आणि कशी मदत घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. 

सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट

यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. अशोक तांबे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. सुजित अडसूळ, डॉ. अंजली खाडे, कोविड केअर सेंटर रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे, शासकीय रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व डॉ. भोई, बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, हे या मालिकेत मार्गदर्शन करतील. कमल ननावरे या योगाबद्दल, तसेच, आहार तज्ज्ञ डॉ. दीपाली शिंदे, मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री नाळे, डॉ. चंद्रशेखर पिल्ले, डॉ. हर्षल राठी हेही यात मार्गदर्शन करतील. 

खरिप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची कोंडी

विद्या प्रतिष्ठानच्या वसुंधरा वाहिनीच्या वतीने सुरू होणारी ही मालिका लोकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल, अनेक गैरसमज दूर होण्यास याने मदत होईल.
 - सुनेत्रा पवार, विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान