इंजिनिअरिंग आणि सायन्स क्षेत्राबाबत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

आठवी ते दहावी व अकरावीचे विद्यार्थी तसेच पालकांसाठी उद्या चर्चासत्र

पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘एक्‍सिड’च्या (एक्‍सलंट एज्युकेशन) वतीने अभियांत्रिकी व विज्ञान क्षेत्रातील करिअर, प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (ता. २) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणाऱ्या या चर्चासत्रात अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेत शिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षेत होणाऱ्या बदलांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. 

अभियांत्रिकीसाठी द्याव्या लागणाऱ्या राज्य पातळीवरील सीईटी आणि देश पातळीवरील जेईई परीक्षांच्या स्वरूपात २०१७ नंतर बदल अपेक्षित आहे. या बदलांचे स्वरूप व अभ्यासक्रम यावर आपणाला प्रा. आशिष दुबे (बीटेक, एमटेक आयआयटी, मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. प्रा. दुबे यांना शिक्षण व करिअर समुपदेशन क्षेत्रातील बारा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 

येणाऱ्या काळात फक्त प्रवेश परीक्षांतच नाही, तर अभ्यासक्रमातही बदल होण्याची शक्‍यता आहे. आठवी-नववी आणि दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या बदलास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मागील वर्षी वैद्यकीय प्रवेश परीक्षांतील (नीट) बदलामुळे विद्यार्थ्यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, तशी परिस्थिती अभियांत्रिकीच्या बाबतीतही होऊ नये, म्हणून या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 

याशिवाय अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच सीईटी आणि जेईई प्रवेश परीक्षांची तयारी तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आठवी-नववीपासूनच तयारीला लागलो तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी आयआयटी, एनआयटी, बीट्‌स, व्हीआयटी, आयआयएससी, आयसर, एनआयएससीआरसारख्या देशभरातील नामांकित शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेशप्रक्रिया यांबाबत मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. 

कधी - रविवार, ता. २ एप्रिल २०१७ 
केव्हा - सकाळी १० वा. 
कोठे - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड 
प्रवेश - विनामूल्य 
नावनोंदणी - www.vidyaseminars.com येथे करावी. 
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५४५९५४७३३.

Web Title: guidance for engineering & science field