जेईई-नीटचा अभ्यास करेल करिअरचा मार्ग सुकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, करिअरमध्ये यश मिळवायचे असेल आणि करिअरबाबतीत आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर जेईई आणि नीट यारखे अभ्यासक्रम तुम्हाला हे मिळवून देऊ शकतात, असे दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले. 

जेईई आणि नीट या परीक्षांची भीती आणि टेन्शन नाही तर आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊन कसे करिअर मजबूत करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी 'सकाळ' फेसबुक लाईव्ह मध्ये पुण्यातील आय आय टीयन्स प्रशिक्षण केंद्राचे मॅनेजिंग डायरेक्टर दुर्गेश मंगेशकर उपस्थित होते. गेल्या रविवारीच जेईईची परीक्षा झाली. 12 वी नंतर घेतली जाणाऱ्या या परीक्षांच्या अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये खुप धाकधुक बघायला मिळते. मग या परीक्षांना पळवाट म्हणून काही विद्यार्थी कमी कठीण असलेले कोर्सही करतात. पण हा उपाय नाही तर आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, करिअरमध्ये यश मिळवायचे असेल आणि करिअरबाबतीत आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर जेईई आणि नीट यारखे अभ्यासक्रम तुम्हाला हे मिळवून देऊ शकतात, असे दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले. 

बऱ्याच विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या परीक्षा महादिव्य वाटतं. पण योग्य पध्दतीने मेहनत घेऊन आणि काही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करुन आपण या परीक्षांचा अभ्यास पुर्ण करता येऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना किंवा करिअर म्हणून जेईई/नीट निवडताना काही गोष्टींबाबत गोंधळ असतो. जेईई मेन्स आणि जेईई अॅडवान्स यांना पात्र होण्यास किती मार्क्स लागतात?, क्रॅश कोर्सचा काही फायदा होतो का?, क्लासरुम कोचिंग किती महत्त्वाचे आहे? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि सोबतच पालकांनाही पडतात. या सगळ्या प्रश्नांचे निरसन मंगेशकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले आहे. या परीक्षांचा अभ्यास करतांना घ्यावयाची काळजी त्यांनी सांगितली आहे. 

इंजिनियरींग आणि मेडिकल या क्षेत्रात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटीक या विषयांवर एकाग्र होण्याविषयी वा रस निर्माण होण्याविषयी विद्यार्थ्यांची बरेच वेळा कुरकुर असते. हा रस निर्माण करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो हेही मंगेशकर यांनी सांगितले. पण 8 वी वा 9 वी पासून जर या अभ्यासक्रमांची माहीती आणि अभ्यास सुरु केला तर हाच प्रवास सहज होतो आणि विद्यार्थ्यांनाही विषयात रस निर्माण होतो. म्हणून इंजिनियरींगची चार वर्ष जर अभ्यासाचा ताण जाणवू द्यायचा नसेल तर जेईईचा अभ्यास कसा उपयोगी ठरतो याचे मार्गदर्शन मंगेशकर यांनी केले. 

या लाईव्हच्या दरम्यान विद्यार्थी आणि पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही मंगेशकर यांनी दिलीत. येत्या शनिवारी (ता. 14) सायंकाळी 5 वाजता मार्गदर्शनाचा दुसरा टप्पा 'सकाळ' फेसबुकवर लाईव्ह होणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी व पालकांना घेता येईल. जर तुम्हालाही जेईई आणि नीट अभ्यासक्रमांबाबत  काही प्रश्न असतील तर तुम्ही 9920698008 या व्हॉट्स अॅप नंबर वर अथवा iitpk@rediffmail.com वर ई मेल वर पाठवू शकता. 

Web Title: Guidance On JEE and NEET Exams By Durgesh Mangeshkar