आधी प्रबोधन, मग हेल्मेटसक्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

गुळुंचे - कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पाच जिल्ह्यांत हेल्मेटसक्तीचा आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी त्याच्या अंमलबजावणीस सुरवात झाली. येत्या १५ जुलैपर्यंत हेल्मेट वापराचे महत्त्व वाहनचालकांना कळावे याकरिता प्रबोधन करण्याचे काम सुरू असून १५ तारखेपासून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्ह्याच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. 

पुणे ग्रामीणसह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. 

काही ठिकाणी हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू आहे. अपघातांचे प्रमाण खरेच कमी करायचे असेल तर केवळ हेल्मेटसक्ती करून चालणार नाही, तर त्याकरिता सदोष सार्वजनिक व्यवस्थेत सुधार करणे गरजेचे आहे. एकीकडे वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात असली तरी बेशिस्त पार्किंग, रस्त्याची दुरवस्था, ठेकेदाराने केलेले निकृष्ट काम, अतिक्रमण, स्पीड ब्रेकर, बेकायदा प्रवासी वाहतूक, सदोष साईडपट्ट्या हे वाहतुकीचे अडसर प्रथम दूर करण्यासाठी प्रभावी व सक्षम यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. आवश्‍यक बदल करायचा असल्यास नागरिक, पोलिस, बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांचे परस्पर सामंजस्य आवश्‍यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.

Web Title: gulunche news First awakening, then helmets