पुणे - किरकोळ वादातून तिघांनी त्यांच्याकडील परवाना नसलेल्या बंदुकीतुन एक गोळी झाडल्याची घटना थेऊर येथील जय मल्हार हॉटेल जवळ शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. .भानुदास शेलार, अजय मुंढे आणि सतीश उर्फ नाना मुंढे अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अजय मुंढे याने बंदुकीतून एक गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी थेऊर जय मल्हार हॉटेल च्या शेजारी येथे असलेल्या मोकळ्या प्लॉटवर फॉर्च्युनर कार मधून उतरुन उघड्यावर लघवी करत थांबले होते. त्यावेळी त्यांना तेथील वॉचमन अक्षय साहेबाराव चव्हाण याने 'इथे लघवीला का थांबले, समोर माझी बायको आहे. तुम्हाला दिसत नही का?' असा जाब त्यांना विचारला'.याबद्दल वॉचमन चव्हाण यांच्यासोबत आरोपींनी बाचाबाची करून त्याला हाताने मारहाण केली. तसेच त्याला दगडही फेकून मारला. मात्र तो दगड शितल चव्हाण यांच्या डोक्याला व पायाला लागला. त्यानंतर फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या अजय मुंढेने हवेत गोळीबार करत तिथून पळ काढला..ही माहिती लोणीकंद पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित गाडी व आरोपीला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे. जखमी महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.