पुणे - प्रेमसंबंधाला झिडकारल्याने व बोलण्यास नकार दिल्याने एकाने प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना बाणेर येथे शुक्रवारी सकाळी घडली. मात्र, पिस्तुलातून गोळी न उडाल्याने उच्चशिक्षित प्रेयसी तरुणी बचावली. या घटनेतील आरोपी पसार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.