नीरा खोऱ्यासाठी खूशखबर, गुंजवणी धरणही भरले   

gunjavani dam
gunjavani dam

वेल्हे (पुणे) : किल्ले तोरणा परिसरामध्ये गेल्या आठवडाभर पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कानंदी नदीवरील गुंजवणी धरण शुक्रवारी (ता. १४) ९८ टक्के भरले आहे. धरणातून नदीपात्रामध्ये ९३८ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.   प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती गुजंवणी धरणाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली.

किल्ले तोरणा व गुजंवणी परिसरात जुन व जुलै महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस पडला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने सुरवात केली. पाच ऑगस्ट रोजी गुजंवणी धरणक्षेत्र परिसरात १८३ मि.मी.पाऊस पडला. तर दुस-या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे घिसर, अंत्रोली, कोदापूर, घेवंडे, निवी येथून मोठ्या प्रमाणात पाणी गुंजवणी धरण परिसरात आले. त्यातून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. 

गुंजवणी धरणाची  ३.६९ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.  आज गुंजवणी धरणात ३.६० टीएमसी पाणीसाठा असून, धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाच्या पाण्यावर रोज दोन मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. धरणातून नदीपात्रामध्ये ९३८ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.  प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com