गुंजवणी धरण ओव्हर फ्लो

धरणक्षेत्र परिसरात चोवीस तासांत १४३ मिलिमीटर पावसाची नोंद
Gunjwani dam overflow
Gunjwani dam overflow

वेल्हे, (पुणे) - तालुक्यातील गुंजवणी धरण क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवार (ता. १०) रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून ३०४० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती नीरा देवधर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल यांनी दिली. यावर्षी गुंजवणी धरण हे दहा दिवस उशिराने भरले ते गतवर्षी गुंजवणी धरण हे ३० जुलैला भरले होते.

वेल्हे तालुक्यातील किल्ले तोरणा परिसर, भट्टी वागदरा, गेळगणी, तर गुंजवणी धरण क्षेत्रामधील निवी , घीसर ,अंत्रोली , घेवंडे, डोंगर दऱ्या परिसरांमध्ये चोवीस तासांत १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अद्यापही जोरदार पाऊस पडत असल्याने धरण क्षेत्रातील साठ्यामध्ये वाढ झाली असून आज बुधवार (ता. १०) रोजी गुंजवणी धरण १००% भरले आहे धरणाची साठवण क्षमता ३.६९ टीएमसी एवढी असून बुधवारी सकाळी ३.६०टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.

धरण क्षेत्रामध्ये अद्यापही जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणाचे दोन्ही स्वयंचलित दरवाजे उघडले असून सांडव्या वरून दुपारी दोन वाजता ३०४०क्युसेकने पाणी गुंजवणी नदीत सोडण्यात आले असून तीव्रतेप्रमाणे विसर्ग कमी जास्त केला जाईल तरी सकल भागातील नागरिकांना तसेच नदीपात्रा जवळील गावांना व शेतकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com