गुरू नानक जयंती उत्साहात साजरी | Wadgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुनानक देव यांची 552 वी जयंती मोठ्या उत्साहात

वडगाव : गुरू नानक जयंती उत्साहात साजरी

रामवाडी : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची 552 वी जयंती मोठ्या उत्साहात वडगावशेरी येथे गुरुद्वारात साजरी करण्यात आली. गुरुनानक यांचा जन्मोत्सव हा गुरुनानक जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शीख बांधवांनी गुरुद्वार पासून ते ब्रह्मा सनसिटी पर्यंत वाहेगुरु नामाचा जप करत प्रभातफेरी काढली. यानिमित्ताने गुरुद्वारामध्ये भजन , कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता.

हेही वाचा: राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे : संजय राऊत

गुरू नानक यांच्या उपदेशाचे म्हणजे गुरुवाणी पाठाचे वाचन करण्यात आले. शीख बांधवांसमवेत इतर धर्मांचे बांधवांनी लंगर मध्ये भोजनाचा स्वाद घेतला. वडगावशेरी सन 1998 साली गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली तेव्हापासून या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरे करीत असल्याचे रवींद्र सिंग यांनी यावेळी सांगितले .

loading image
go to top