गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी थोपटले दंड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी दंड थोपटले आहेत. गुटखा बहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची 33 पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात छापे टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांवर 23 गुन्हे दाखल करत 12 लाख 26 हजार 463 रुपयांचा गुटखा व सिगारेट जप्त केले आहे.

पुणे - अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी दंड थोपटले आहेत. गुटखा बहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची 33 पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात छापे टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांवर 23 गुन्हे दाखल करत 12 लाख 26 हजार 463 रुपयांचा गुटखा व सिगारेट जप्त केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी (ता. 3) दिवसभरात ही कारवाई करण्यात आली. शहरातील अमली पदार्थ आणि गुटखा विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार घेतल्यानंतर त्वरित दिले होते. त्यानंतर काही ठिकाणी कारवाई केल्यानंतर ही शहरातील हडपसर, कोंढवा, वानवडी, फरासखाना, खडकी, विमानतळ,कोथरूड, वारजे, उत्तमनगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गुटखा विक्री व वाहतूक होत असल्याबाबत माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 33 पथके तयार करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार छापे टाकून 23 गुन्हे दाखल करत 29 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैधपणे गुटखा व सिगारेट विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आसगावकर गुरूजीच शिक्षकांचे आमदार; पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा

यापूर्वीही 12 गुन्हे दाखल -
गेल्या महिन्यात देखील विविध ठिकाणी कारवाई करत 12 गुन्हे दाखल करत 18 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 22 लाख 27 हजार 950 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. गुन्हे शाखेने खराडी येथे गुटखा विक्रीवर कारवाई केल्यानंतर शहरात गुटख्याच्या पैशातून चालणारे मोठे हवाला रॅकेट देखील नुकतेच उघडकीस आले आहे. या ठिकाणाहून गुटखा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरविला जात असल्याचे उघडकीस आले होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha Seller Crime Pune Police Watching