पुण्यातील जिम चालकासह त्या विद्यार्थीनीचा दहशतवादी कटात सहभागी असल्याचा संशय :NIA

सुशांत जाधव
मंगळवार, 14 जुलै 2020

दहशतवादी संघटनेशी सलग्नित इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (आयएसकेपी) शी संबंधित जोडप्याच्या संपर्कात असलेल्या पुण्यातील दोघांना एनआयएने अटक केली आहे

पुणे : इस्लामिक स्टेट (आयएस) शी संबंधी असलेल्या संघटनेशी नाव जोडलेल्या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) अटक केली आहे.   व्यायामशाळा चालवणाऱ्यासह एका पत्रकारितेच्या विद्यार्थीनीचा यात समावेश आहे.  या प्रकरणातील पुढील तपासासाठी त्यांना सोमवारी दिल्लीला नेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षात असलेल्या दिल्लीतील काश्मिरी जोडप्याशी त्यांचा काही संबंध आहे का? या संदर्भातील  चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील या जोडप्यावर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (आयएसकेपी) शी संबंधित असल्याचा आरोप आहे. त्यांना 8 मार्च रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षात दाखल करण्यात आले आहे.

ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एनआयएने रविवारी पुण्यात व्यायामशाळा चालवणारे नबील खत्री (वय 27) आणि पुण्यातील  महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सादिया शेख (वय 22) या दोघांना  अटक केली. खत्री याच्यावर देशात हिंसक दहशतवादी हल्ल्या घडवून आणण्याचा योजना आखण्यात मदत केल्याचा आरोप आहे. तर सादिया आयएसमध्ये एक कॅडर तयार करण्याचा प्रयत्न करीत होती, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार,  खत्री आणि सादिया शेख दोघेही काश्मिर  जहानाझाब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेघ यांच्या संपर्कात होते.  

-चंबळमधलं गुंडाराज संपवणाऱ्या IPS अधिकाऱ्याने केलं विकास दुबेच्या एन्काउंटरचं नेतृत्व​

दिल्लीत वास्तव्यास असलेल्या काश्मिरी दांपत्याचा 'इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (आयएसकेपी) शी संबंध आहे. ही संघटना बदी घालण्यात आलेल्या आयएसचा एक भाग आहे.  विध्वंसक आणि देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे आढळले. एनआयएच्या आणखी एका प्रकरणात (आयएसआयएस अबु दाभी मॉड्यूल) तिहार तुरूंगात आधीच कैदी असलेले अब्दुल्ला बासिथ यांच्याशी त्यांचा संपर्क असल्याचेही एनआयएने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gym operator And journalism student from Pune planned terror activities with Kashmiri couple IS links says NIA