
पुणे : जीम ट्रेनर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना खराडी येथे घडली. आरोपीने व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे सांगून तरुणीला धमकावले होते.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे असलेल्या एका जीममध्ये पिडीत तरुणी आणि आरोपी चौगुले हे दोघेजण ट्रेनर म्हणून काम करीत होते. तीन दिवसांपूर्वी रात्री चौगुले याने तरुणीला फेसबुक कॉल केला. त्याने त्याला भूक लागल्याचे सांगून तिला जेवणाचा डबा घेऊन बोलाविले. तरुणी जेवणाचा डब्बा घेऊन आली. त्यानंतर त्याने तरुणीला शीतपेयात गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यासाठी दिले. त्यानंतर तरुणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. आरोपीने या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले.
तरुणी शुद्धीवर आल्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे तिला मोठा धक्का बसला. त्यावेळी आरोपीने तिला त्याने केलेले व्हिडीओ चित्रीकरण दाखवून या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे तरुणी घाबरली होती. त्यानंतरही तिने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक किरण औटे करीत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.