जिम ट्रेनर म्हणतायेत,  जगण्यासाठी करावं लागतयं मिळेल ते काम 

jee---12.jpg
jee---12.jpg

रामवाडी  : शरीर तंदुरुस्ती व स्लिम फंडा यासाठी तरुणाईबरोबर पुरुष व महिलांची अफाट गर्दी जिममध्ये होत होती मात्र, मार्च महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे प्रशासनाकडून बंद केलेल्या जिम ट्रेनरचे अर्थिक गणित मात्र कोलमडले. जगण्यासाठी मिळेल ते काम करण्याची खुणगाठ मनाशी बांधून गेल्या तीन महिन्यापासून पंकज पोळेकर हा तरुण एका बॅंकेत मदतनीस म्हणून काम करत आहे. 


विमाननगर येथे राहणारा जीम ट्रेनर पंकज पोळेकर याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. खासगी जिममध्ये दहा वर्ष ट्रेनर म्हणून कार्यरत होता. पण जिम बंद झाल्यामुळे तीन महिन्यांपासुन वडगावशेरीतील बॅंक ऑफ बडोदामध्ये दरवाजा जवळच खुर्ची मांडून बसलेला असतो. ग्राहक बॅंकेच्या दरवाजाजवळ आला की त्याची थर्मल टेस्ट करणे, त्याच्या हातावर सॅनिटायझरचे काही थेंब टाकणे अशा प्रकारे ग्राहक व कर्मचारी यांची तो काळजी घेत असतो. गर्दी होऊ नये यासाठी फक्त पाच याप्रमाणे ग्राहकांना आत मध्ये सोडतो.

ग्राहकांना बॅंकेत पैसे भरण्याची तसेच काढण्याची स्लिप देणे. महिला व ज्येष्ठांना सिल्प भरताना अडचण आली तर माहिती सांगणे. नवीन खातेदारांना फॉर्म देणे, अशा प्रकारची मदत करत असतो. दिवसाला मिळणाऱ्या मोजक्‍या पैशांवर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. जिम केव्हा उघडेल माहित नाही. पण प्रामाणिकपणे मिळेल ते काम करून कुटुंबासह जगायचं एवढंच मला माहिते असे पंकज पोळेकर यांनी सांगतिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com