एचए' कंपनीला 'असा' बसला कोरोनाचा फटका; 600 कोटींच्या कर्जाची मागणी

HA company is demanding loan of Rs 600 crore due to Corona
HA company is demanding loan of Rs 600 crore due to Corona

पिंपरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हिंदुस्थान एंटियाबोयिक्‍स कंपनी (एचए) साठी चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा भासत असून त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे, केंद्र सरकारने एकूण 600 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिल्यास कंपनीला स्वतःचे 12 प्रकारांच्या सक्रीय औषधे घटकांसाठी (एपीआय) प्रकल्प सुरु करता येईल. तसेच चीनवरील अवलंबित्व देखील कमी होईल, असा प्रस्ताव कंपनीने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

पिंपरी येथील एचए कंपनीचे 'एपीआय'चे उत्पादन 2003 पासून बंद आहे. त्यामुळे, कंपनी चीनमधून 'एपीआय'साठी कच्च्या माल आयात करते. मात्र, सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा विपरीत परिणाम कच्च्या मालाच्या आयातीवर झाला आहे. कंपनीतील सध्या बंद असलेले सर्व प्रकल्प चालू आहेत. त्यामुळे, चीनमधून कच्चा माल आयात करण्याऐवजी स्वतःचे उत्पादन सुरु करण्यासंदर्भात कंपनीचा विचार चालू आहे. 

पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ म्हणाल्या,"कंपनीची 2016-17 मध्ये 8 कोटी इतकी एकूण उलाढाल होती. मात्र, मागील वर्षी उलाढाल 67 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्‍शन्स, आयव्ही आदी सर्व उत्पादनांचे प्रकल्प चालू आहेत. चीनमधील कच्च्या मालाच्या आयातीसाठी दरवर्षी 15 कोटी रुपये खर्च होत आहेत. आम्ही 12 प्रकारच्या 'एपीआय'चे उत्पादन करण्यास सक्षम आहोत. मात्र, प्रत्येक प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये असे एकूण 600 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे, कंपनीने हा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे. आम्हाला ही रक्कम कर्ज स्वरुपात हवी असून येत्या 3 वर्षांत आम्ही त्याची परतफेड करु. सर्व प्रकल्प सक्षमपणे चालू झाल्यावर कंपनी 2 वर्षांत निश्‍चितच तोट्यामधून बाहेर पडेल.'' 

...या वाहन मालकाने किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले पहा

भारतीय कंपन्यांनाही पुरवठा होणार ! 
"देशभरातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील औषधे उत्पादक कंपन्या मुख्यत्वे चीनकडूनच कच्चा माल आयात करतात. एचए कंपनीला 600 कोटी रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिल्यास "एचए' या इतर सर्व देशी कंपन्यांना कच्चा माल पुरवू शकेल'', असा विश्‍वासही नीरजा सराफ यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com