हडपसरः बंटर स्कूल येथे मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती.
हडपसरः बंटर स्कूल येथे मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती.

हडपसर विधानसभा मतदार संघात नागरिकांना मनस्ताप

हडपसर (पुणे): हडपसर विधानसभा मतदार संघात अनेक मतदार केंद्रांवर मतदार यादीतील घोळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. आपले नाव शोधण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना फिरावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

अनेक दिवंगत व्यक्तींची नावे यादीत असल्याचे दिसून आले. मोठ्या उत्साहाने मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या पदरी मात्र निराशा आली. मतदान याद्यात नावचं नसल्यामुळे गोंधळ उडाला. मतदान ओळखपत्र असून सुद्धा मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जवळपास प्रत्येक मतदार संघांमध्ये अनेक मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही मतदार यादीत त्यांचे नावच नव्हते. त्याशिवाच मतदार यादीत नाव एकाचे तर छायातित्र दुस-याचे हे चित्र पहायला मिळाले.

अनेक वर्षांपासून एकाच बुथवर मतदान करणाऱ्यांची नावे यावेळी मात्र दुसऱ्याच केंद्रावर होती. त्यामुळे मतदाराला धावपळ करावी लागली. सकाळी ११ वाजेपर्यंत १२.७१ टक्के मतदान झाले. सकाळी सात ते नउ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रावर ६ ते ८ टक्के मतदान झाली. सकाळी ९ ते ११ या दोन तासात झालेल्या मतदानामध्ये महिलांच्यापेक्षा पुरूष मतदारांची संख्या अधिक होती. सकाळी अकरा वाजल्यानंतर घरकाम उरकल्यानंतर महिलांची मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली.

दिव्यांगासाठी मतदान केंद्र ही पहिल्या मजल्यावर करण्यात आली होती. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली होती. हवामान खात्याने मतदाना दिवशी पाऊस पडेल असे जाहिर केले होते. मात्र, पाउस न आल्याने मतदारांनी दुपारी ११ नंतर मतदान केंद्रवार मतदान करण्यासाठी गर्दी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com