हडपसर : मगर रुग्णालयातील लहान मुलांचे कोव्हिड सेंटर सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर : मगर रुग्णालयातील लहान मुलांचे कोव्हिड सेंटर सज्ज

हडपसर : मगर रुग्णालयातील लहान मुलांचे कोव्हिड सेंटर सज्ज

पुणे (हडपसर) : कोव्हिडच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन येथील मगरपट्टा चौकातील महानगरपालिकेच्या कै. अण्णासाहेब मगर रुग्णालयात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर सुरू होत आहे. आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या असून कोव्हिड बाधीत लहान मुलांवरील उपचारासाठी हे केंद्र सज्ज झाले आहे.

कोव्हिडच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका वर्तविण्यात आला आहे. ते लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध सहा ठिकाणी त्यांच्यासाठी सर्व सुविधांनी युक्त कोव्हिड केंद्रे उभारली जात आहेत. त्यापैकी हडपसर येथील अण्णासाहेब मगर रूग्णालयात स्वतंत्र बावन्न बेडचे स्वतंत्र सेंटर उभारण्यात आले आहे. चौदा पंधरा रुममध्ये सुरू होणाऱ्या या सेंटरमध्ये अतिदक्षता विभाग करण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, पाणी, ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले, "पोलिसांच्या ताब्यात असलेली रुग्णालयाची इमारत खाली करून त्यासह सध्या सुरू असलेली रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीमध्ये लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर सुरू होत आहे. तेथील दैनंदिन ओपीडी भोसलेगार्डन येथे हलविण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य तीसऱ्या लाटेला सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होईल.'

रूग्णालयाचे प्रमुख डॉ. श्याम राठोड म्हणाले, "संभाव्य तीसऱ्या लाटेच्या दृष्टीने या ठिकाणी सुरू होणाऱ्या लहान मुलांच्या कोव्हिड सेंटरमुळे रूग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे. त्यासाठीची सर्व सुविधा येथे देण्यात आली आहे. सध्या काही किरकोळ कामे वगळता उपचारासाठी आवश्यक सर्व पूर्तता झाली आहे.'

loading image
go to top