Share Market Investment Scam in Hadapsar
पुणे : हडपसर परिसरातील एका ४८ वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी एक कोटी २० लाख ७४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पाच सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादीशी व्हॉटसअॅपद्वारे संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.