हडपसर- रामटेकडी कचरा प्रकल्प विरोधात आंदोलन

संदीप जगदाळे
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

हडपसर- रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव कृती समितीच्या वतीने नियोजीत कचरा प्रकल्पाच्या विरोधासाठी निषेध मोर्चा काढला, यावेळी आढळऱाव पाटील बोलत होते. ससाणेनगर रेल्वे फाटक ते रामटेकडी कचरा प्रकल्प या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. या विराट मोर्चात सुमारे पाच हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. काळे झेंडे दाखवून आंदोलकांनी भाजप सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर आणि आयुक्तांच्या विरोधात जोरदार निदर्शने केले. 

हडपसर : राज्यातील व पालिकेतील सत्ताधा-यांनी औंधला स्मार्ट सिटी आणि हडपसरला कचरा सिटी बनविण्याचा ध्यास घेतला आहे. भाजपाच्या आमदारांची कचरा प्रकल्पात भागीदारी आहे. हडपसरच्या आमदाराला देखील रामटेकडी येथे कचरा प्रकल्प उभारून मलिदा लाटायचा आहे. मात्र या अन्यायाला हडपसरवासीय बळी पडणार नाहीत. मावळ येथील आंदोलनात तीन आंदोलक ठार झाले. त्याचप्रमाणे रामटेकडी येथे कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी मृत्यूला कवटाळण्याची आमची तयारी आहे. हडपसरकारांची वज्रमुठ पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडणारी ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी येथील कचरा प्रकल्प रद्द करावा अन्यथा जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांनी केले. 

हडपसर- रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव कृती समितीच्या वतीने नियोजीत कचरा प्रकल्पाच्या विरोधासाठी निषेध मोर्चा काढला, यावेळी आढळऱाव पाटील बोलत होते. ससाणेनगर रेल्वे फाटक ते रामटेकडी कचरा प्रकल्प या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. या विराट मोर्चात सुमारे पाच हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. काळे झेंडे दाखवून आंदोलकांनी भाजप सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर आणि आयुक्तांच्या विरोधात जोरदार निदर्शने केले. 

याप्रसंगी माजी राज्यमंत्री मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, विरोधी पक्ष नेते चेतन पाटील, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक  वैशाली बनकर, चंचला कोद्रे, बंडूतात्या गायकवाड, आनंद अलकुंटे, अशोक कांबळे, प्रशांत जगताप, प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, विजय देशमुख, तानाजी लोणकर, अभिजीत शिवरकर, फारूख इनामदार, विजया वाडकर, सुनिल बनकर, प्रशांत तुपे, संजय शिंदे, शफी इनामदार, सिमात सावंत, विठ्ठल सातव, वैभव डांगमाळी, हेमंत ढमढेरे, मुकेश वाडकर, जयसिंग गोंधळे, प्रशांत सुरसे, जयसिंग भानगिरे, सविता मोरे, प्रमोद डब्बीर, डॅा. शंतून जगदाळे, वैभव माने, अॅड. के. टी. आरू, नितीन आरू, महेंद्र बनकर, अमोल हरपळे, कलेश्र्वर घुले, महेश ससाणे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि जनता दल तसेच विविध शाळांचे विदयार्थी व संघटनांचे पदाधीकारी या मोर्चात सहभागी झाले होते. 

विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले, शहरात रोज १००० हजार टन ओला कचरा तयार होते. शहरात ३६ कचरा प्रकीया प्रकल्प आहेत. पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील सर्व प्रकल्प बंद असून शहरातील अनेक प्रकल्प बंद आहेत. ते पुर्ण क्षमतेने सुरू केल्यास १५०० टन रोज कचरा प्रकीया होऊ शकते. त्यामुळे नवीन प्रकल्पाची गरजच नाही. कचरा प्रकल्प उभारण्याचा हट्ट केवळ भ्रष्टाचारासाठीच व आर्थिक सबंधातून होत आहे. कच-यातून पैसे खाणा-याला आमदाराला व सत्ताधा-यांना जनतेने बळी पडून नये. हा मोर्चा केवळ ठिणगी आहे. हडपसरमध्ये अगोदरच पाच कचरा प्रकल्प असताना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नवीन प्रकल्पाच्या विरोधासाठी सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून लढा दयायला हवा. 

Web Title: hadapsar dumping issue protest