Balasaheb Shivarkar : घटना वाचवायची असेल तर पुरोगामी विचारांना पुढे न्यावे लागेल

स्वातंत्र्यापासून आम्ही जो बंधु भाव जोपासला होता, तो सत्तेत बसलेला पक्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे.
Congress Committee Jansanwad Yatra
Congress Committee Jansanwad YatraSakal

हडपसर - स्वातंत्र्यापासून आम्ही जो बंधु भाव जोपासला होता, तो सत्तेत बसलेला पक्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणात सर्वसामान्यांना काँग्रेसचा आधार वाटत असल्याचे जाणवत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली सर्वसमावेशक घटना वाचवायची गरज आज निर्माण झाली आहे. त्यासाठी भविष्यात आपल्याला पुरोगामी विचारांची भूमिका घेऊन पुढे जावे लागेल, असे मत माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले.

शहर-जिल्हा काँग्रेस समिती व हडपसर विधानसभा काँग्रेस समितीच्या वतीने येथील गांधी चौकात जन संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर बोलत होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, कमल व्यवहारे, पूजा आनंद, माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर, विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे, प्रशांत तुपे, गणेश फुलारे, उर्मिला आरु, पल्लवी सुरसे, प्रकाश पवार, प्रशांत सुरसे, शफीभाई इनामदार, नितीन आरु, शहाजी मगर, विजय जाधव, इंदिरा तुपे, माऊली तुपे, पुष्पा गायकवाड, बाळासाहेब हिंगणे, वसंत शेवाळे, माया डुरे, संजय डोंगरे, सुलतान खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, 'भाजपने हुकूमशाही सुरू केली आहे. परंतु, काँग्रेसचा विचार कोणीही संपू शकणार नाही. जनता आता भाजपा सरकारला कंटाळलेली आहे. त्यामुळे येणारे सरकार हे महाविकास आघाडीचेच असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com