रयत शिक्षण संस्थेत पुण्याच्या एका आमदारांना मोठी संधी

rayat shikshan sanstha
rayat shikshan sanstha

पुणे - रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड आज करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांमध्ये पुण्यातील आमदार चेतन तुपे यांना मोठी संधी मिळाली आहे. हडपसरचे आमदार असलेल्या चेतन तुपे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्याच्याशिवाय उपाध्यक्षपदी डॉ. एनडी पाटील, भाई गणपतराव देशमुख, जयश्रीताई चौगुले यांचीही निवड झाली. तीन वर्षांसाठी सचिव पदी प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव शिवणकर यांची नियुक्ती केली. शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत ही निवडप्रक्रिया पार पडली.

रयत शिक्षण संस्थेच्या सभासदांची बैठक दरवर्षी 9 मे रोजी साताऱ्यात होते. मात्र यंदा कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. नवी मुंबई इथल्या केबीबी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव शिवणकर यांची संस्थेच्या सचिवपदी निवड करण्यात आली. शिवणकर हे सांगली जिल्ह्यातल्या विसापूर गावचे असून ते 1986 पासून रयत सेवक म्हणून कार्यरत आहेत. 

कोरोनाच्या काळात रयत शिक्षण संस्थेच्या  शैक्षणिक कार्याची माहिती देताना शिवणकर म्ङणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेनं विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. त्यांच्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचू शकते का याची माहिती घेतली. डिजिटल, ऑनलाइन पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील असंही डॉक्टर शिवणकर यांनी सांगितलं. मुल्यशिक्षण, पारंपरिक शिक्षणाला  नव्या डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणाची जोड देत ते अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न संस्थेचा असेल असं ते म्हणाले. 

पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेवेळी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. दिलीप वळसे-पाटील,पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, गणपराव देशमुख, डॉ.एन.डी.पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर,डॉ. अनिल पाटील, संजीव पाटील, मावळते सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. या निवडी आतापर्यंत कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जातात. यंदा कोरोना विषाणुच्या प्रसार रोखण्याकरीता संचारबंदी तसेच जिल्हाबंदी होती. त्यामुळे रयतचे जनरल बॉडी सदस्य सभेसाठी येऊ शकत नव्हते. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com