नेहरू पार्क
नेहरू पार्कsakal

हडपसर : नेहरू पार्क व साई विहार कॉलनीला लवकरच मिळणार मुबलक पाणी

नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या विकासनिधीतून तुकाईटेकडीच्या पाण्याच्या टाकीतून या भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार

हडपसर : सकाळने प्रसिद्ध केलेल्या "हडपसरच्या नेहरू पार्क मध्ये सुविधांचा अभाव' या बातमीची पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दखल घेतली आहे. नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या विकासनिधीतून तुकाईटेकडीच्या पाण्याच्या टाकीतून या भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे. येथील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन आज झाले.

महंमदवाडी-कौसरबाग (प्रभाग क्र. २६) मधील काळेपडळ परिसरातील रेल्वेलाईन जवळील नेहरू पार्क मस्जिद गल्लीतील पाणी, ड्रेनेज, रस्ता व धोकादायक विद्युत वाहिनीचा प्रश्न सकाळने मांडला होता. पालिका अधिकारी व नगरसेवक भानगिरे यांनी दोन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाण्याचे अश्वासन दिले होते.

नेहरू पार्क
मोदी अमेरिकेत आणि बायडेननी दिला मोठा धक्का; ‘या’ गोष्टीतून वगळलं भारताला

त्यानुसार नगरसेवक भानगिरे यांनी पुढाकार घेऊन नेहरू पार्क व साई विहार कॉलनीसाठी पिण्याच्या पाण्याची वाहिनी तर अष्टविनायक कॉलनीसाठी नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी पक्षाच्या वतीने जबाबदारी घेतलेल्या नव्याने समाविष्ट हांडेवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी या गावांसह प्रभागातील काही ठिकाणी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरूकेले आहेत. त्याचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

नगरसेवक भानगिरे म्हणाले, "येथील नागरिकांचा अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न आहे. तुकाईटेकडी पाण्याच्या टाकीपासून सुमारे एक किलोमीटर सोळा इंची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. सांडपाणी वाहिनीसाठीही स्वतंत्र निधीची तरतूद करून काम सुरू करण्यात आले आहे.'

"नेहरूपार्क, अष्टविनायक कॉलनी येथील सांडपाणी वाहिनीचे सुमारे सतरा लाख रूपयांच्या कामाची निविदा मंजूर झाली आहे. नेहरूपार्कच्या धोकादायक वीजवाहिन्या हटविण्यासाठी नगरसेवक भानगिरे यांनी बावीस लाख रूपयांचा प्रस्ताव दिला आहे. त्याला मंजूरी मिळताच काम केले जाईल.'

- प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com