Pune Crime: पुणे पोलिसांची थेट बिहारमध्ये कारवाई! 22 लाखांच्या मुद्देमालासह तिघे मोबाईल चोर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thief Arrested

Pune Crime: पुणे पोलिसांची थेट बिहारमध्ये कारवाई! 22 लाखांच्या मुद्देमालासह तिघे मोबाईल चोर अटकेत

Yeपुणे : हडपसर पोलिसांनी थेट बिहार मध्ये कारवाई करत मोबाईल चोरणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. पुण्यातील ५ नामांकित मोबाईल शॉपी मधून १०० मोबाईल चोरी करून विकणाऱ्या तिघांना पोलिसांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

साहिल अनिल मोरे (२०), संकेत निवगुने (२०) आणि लक्ष्मण जाधव (२४) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील जाधव हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. हडपसर, सिंहगड रोड, भरती विद्यापीठ भागातील अनेक मोबाईलच्या दुकानांमध्ये या टोळीने आत्तापर्यंत १०० मोबाईल फोन चोरले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: Sattar Controversy: सुप्रिया सुळेंना पती सदानंद सुळेंचा पाठिंबा; सत्तारांच्या विधानावरुन व्यक्त केल्या भावना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे ही पुण्यातील विविध भागात असणाऱ्या मोबाईल शॉपी वर लक्ष ठेऊन असायचे आणि ती फोडून महाग असलेले मोबाईल फोन चोरी करायचे. यातील साहिल मोरे आणि संकेत निवगुने हे दुकानातून मोबाईल चोरून आणल्यानंतर लक्ष्मण जाधवकडे द्यायचे आणि त्याबदल्यात कमिशन घ्यायचे. जाधव चोरलेले मोबाईल फोन बिहारमध्ये जाऊन विकायचा. पोलिसांना जाधव हा बिहार मध्ये असल्याचे कळताच टीम रवाना केली आणि जाधवला ताब्यात घेतले.

हेही वाचा: Supriya Sule: अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंचं भाष्य, म्हणाल्या…

या तिघांकडे १०० मोबाईल फोन, एक चार चाकी आणि एक दुचाकी असा २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Pune News