
Pune Police
Sakal
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात एका सोसायटी मध्ये घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींनी थेट सोसायटीमधील सीसीटिव्हीमध्ये पिस्तूल दाखवले होते. ही घटना समोर आल्यावर कोथरूड पोलिसांनी व्हिडिओमध्ये असलेली गोष्ट पिस्तूल नव्हे लायटर असल्याचा ठामपणे दावा केला होता. आता पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी त्याच तरुणांना वाहन चोरीप्रकरणी ताब्यात घेताच त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त झाले. त्यामुळे कॅमेऱ्यात दिसलेले ती गोष्ट लायटर नव्हे पिस्तूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.