ऐकली नागरिकांची गाऱ्हाणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

हडपसर - प्रभाग क्र. २२ मधील भाजप उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार केला. मतदार भगिनींकडून ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मतदारांनी उमेदवारांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या नियोजित वेळेत सोडविण्याच्या दृष्टीने भाजपला मत देण्याचे आवाहन केले. 

भाजपचे उमेदवार माजी स्थायी समिती अध्यक्ष दिलीप तुपे, सुकन्या गायकवाड, संदीप दळवी, माजी नगरसेविका सुजाता जमदाडे यांनी दिवसभर एकत्र प्रचार केला. सर्व उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधून आपल्या जाहीरनाम्याचे पत्रक वाटप केले. प्रामुख्याने मुंढवा गावठाण, चावडी, वाडेकर आळी परिसरात त्यांनी दिवसभर प्रचार केला. 

केंद्र आणि राज्य सरकारने स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराचा सहभाग केला आहे. या योजनेला गती देणे, हडपसर रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, मुठा नदी प्रदूषण मुक्त योजना, रेल्वे उड्डाण पुलास परवानगी आणणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्य सरकारने नवीन विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मुंढव्याचा मोठा भाग निवासी झाल्याने मतदार खूष आहेत. त्यामुळे प्रचार करत असताना घरोघरी मतदारांचा आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचे भाजपच्या चारही उमेदवारांनी सांगितले. 

प्रचारात रमाकांत गायकवाड, ॲड. नंदकिशोर गायकवाड, ॲड. संजय गायवाड, जयवंत जगताप, धनसिंग परदेशी, रवी तुपे, विनायक गायकवाड, बबन पठारे, सुलभा क्षीरसागर, मामा कुदळे, अशोक जगताप, सुनील डांगमाळी, बाळासाहेब मोरे, सोमनाथ तुपे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

मुंढवा परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रेल्वे उड्डाण पूल उभारणे, महात्मा फुले चौकात भुयारी मार्ग करणे व सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर देणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

Web Title: hadapsar prabhag 22