

Shiv Sena Alleges Severe Negligence by Hadapsar Sahyadri Hospital
Sakal
पुणे : हडपसर येथील सह्याद्री रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाला प्राण गमवावे लागले. रुग्णांच्या नातेवाइकांची केलेली दिशाभूल यास सर्वस्वी सह्याद्रीचे प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी गुरूवारी केला आहे. रुग्णालयाने वैद्यकीय शिष्टाचार पाळले नसल्याने या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.