

Shiv Sena Protests Over Delayed DP Roads in Sasane Nagar
Sakal
हडपसर : ससाणेनगर रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून पाहिले जाणारे लोहिया उद्यान व ग्लायडिंग सेंटर शेजारील डीपी रस्त्यांचे काम गेली अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यातच येथील कालव्यावरील पुलाचे दगडी खांब ढासळू लागले आहेत. त्यामुळे पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला असतानाही पालिका प्रशासन याकडे गंभीर दुर्लक्ष करत आहे. या दिरंगाईकडे लक्ष्य वेधन्यासाठी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, शैलजा भानगिरे, अयोध्या आंधळे, दत्ता खवळे, राहुल काळे, सिद्धार्थ भानगिरे, बबन पवार, बंडू सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.