

(धन की बातसाठी लेख)
लोगो- शेअर बाजार
हिंदुस्थान एरोनॉटिक्स
शुक्रवार भाव बंद ः रु. ४९१०
मकरंद विपट
‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट, INH००००२०४०२
-----------------------------------
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. अर्थात ‘एचएएल’ ही विमाने व हेलिकॉप्टरची निर्मिती, दुरुस्ती आणि देखभाल करणारी भारतातील संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. याशिवाय, ती विमाने व हेलिकॉप्टरसाठी लागणारी इंजिने आणि सुटे भागही तयार करते. अलीकडेच भारत सरकारने १२ ‘सु-३० एमकेआय’ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी १३,५०० कोटी रुपयांचा आणि २४० ‘एएल-३१ एफपी’ एरो इंजिनांच्या पुरवठ्यासाठी २६,००० कोटी रुपयांचा स्वतंत्र करार ‘एचएएल’सोबत केला आहे. या करारांमुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मोठी चालना मिळाली असून, कंपनीच्या विक्रमी ‘ऑर्डर बुक’चे मूल्य २.५४ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.
याचाच परिणाम म्हणून या कंपनीचा शेअर तांत्रिक विश्लेषणाच्या तक्त्यावर खरेदीचे संकेत देत आहे. या शेअरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या साप्ताहिक पातळीचा आलेखानुसार, ऑक्टोबर २०२३ रोजी या शेअरचा भाव १७५० रुपयांच्या आसपास होता. तिथून या शेअरच्या भावात एक मोठी तेजी आली. जुलै २०२४ मध्ये या शेअरचा भाव ५६०० रुपयांपर्यंत गेला आणि त्यानंतर हा शेअर एका असेंडिंग ट्रँगल पॅटर्नमध्ये अडकला. गेल्या शुक्रवारी या शेअरने हा असेंडिंग ट्रँगल पॅटर्न तोडून मोठ्या संख्येच्या उलाढालीने वरच्या दिशेने बंद भाव दिला. हा पॅटर्न या शेअरची खरेदी करावी, असे संकेत देत आहे. एका वर्षाच्या कालावधीत या शेअरचा भाव ७४०० रुपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. या व्यवहारासाठी साप्ताहिक पातळीवर ४७८० रुपयांचा स्टॉपलॉस लावावा.
(ग्राफ सेव्ह केला आहे)
(डिस्क्लेमर ः माझा या कंपनीमध्ये कोणताही फायनान्शिअल इंटरेस्ट नाही. मला या कंपनीमधून गेल्या वर्षभरात कोणत्याही प्रकारचे कॉम्पेन्सेशन मिळाले नाही. मी या कंपनीत कोणत्याही पदावर नाही अथवा या कंपनीत कोणत्याही प्रकारची भागीदारी नाही; तसेच कंपनीच्या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्येही माझा कसलाही सहभाग नाही.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.