पीएमपीची प्रवाशांसाठी खास योजना; आता असाही मिळणार दैनिक पास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

  • पीएमपीचा आता अर्ध दैनिक पास 
  • मडिगेरी यांची माहिती
  • बारा तासांसाठी 40 रुपये आकारण्याची सूचना 

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सर्वच मार्गांवर दैनिक पास 70 रुपयांत दिला जात आहे. मात्र उत्पन्नात वाढ आणि खर्चात काटकसर करण्यासाठी 12 तासांसाठी अर्ध दैनिक पास देण्याची सूचना पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन रंगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अर्ध दैनिक पासची किंमत 40 रुपये ठेवण्याची सूचनाही केली आहे. यातून रोज 20 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल, अशी माहिती महापालिका स्थायी समिती सभापती व पीएमपीचे संचालक विलास मडिगेरी यांनी दिली. 

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

पीएमपीच्या बदली हंगामी रोजंदारीवरील 44 वाहकांना कायम करण्यात आले आहे, असे सांगून मडिगेरी म्हणाले, ""पीएमपी संचालक मंडळाच्या 16 जानेवारीच्या बैठकीत रोजंदारीवरील बदली सेवक म्हणून काम करणारे 335 चालक, 877 वाहक, 145 मदतनीस, 15 झाडूवाला अशा एक हजार 372 जणांना मंजूर पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार त्यांना कामाचे आदेश दिले. त्याचवेळी बदली हंगामी रोजंदारी राहिलेल्या 44 कर्मचाऱ्यांना शेड्यूल्ड मान्य रिक्त जागेवर घेण्याचा निर्णयही झाला होता. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी रक्कम, वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार 44 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे. सेवानिवृत्त कामगारांना ग्रॅच्युइटी रकमेचे व वैद्यकीय साह्य योजनेच्या थकीत बिल रकमेच्या धनादेशांचे वाटपही करण्यात आले.''

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

पीएमपीचे अन्य निर्णय 
- मेपासून सप्टेंबर 2019 पर्यंत सेवानिवृत्त सेवकांची संख्या 196 होती. त्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम 11 कोटी 47 लाख 18 हजार 350 रुपये आहे. त्याबाबतचे धनादेश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. 
- पीएमपीचे सात कर्मचारी जानेवारीअखेर सेवानिवृत्त झाले. त्यात चार वाहकांसह प्रत्येकी एक चालक, क्‍लीनर व सफाई कामगाराचा समावेश आहे. त्यांचा सेवाउपदान रकमेचे धनादेश देऊन सत्कार केला. 
- 2017 पासून 510 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वत: वैद्यकीय उपचारासाठी खर्च केला. त्याची रक्कम 94 लाख रुपये आहे. 141 कर्मचाऱ्यांच्या खर्चाची प्रतिपूर्ती करून धनादेश दिले. उर्वरित 369 जणांचे धनादेश पुढील आठवड्यात देण्यात येतील. 
- हॉस्पिटलची देणी थकीत असल्याने सेवकांना उपचारासाठी दाखल होताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे हॉस्पिटलची एक कोटी 90 लाख रुपयांच्या वैद्यकीय खर्चाची बिले देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. 
- सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न आणणाऱ्या वाहक व चालकांना 10 टक्के रक्कम देण्याबाबत सुचविलेले आहे. याचा लाभ कर्मचाऱ्यांसह पीएमपीच्या उत्पन्नात दररोज दीड कोटीपर्यंत वाढ होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half daily pass scheme From PMP

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: