हाफ पँन्ट, पायात स्लीपर घालणाऱ्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे : आता हॉटेलमध्ये काही खाण्यासाठी जात असताना अंगावर काय कपडे घातले आहेत हे पाहूनच हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या 'एजंट जॅक' हॉटेलमध्ये हाफ पँन्ट आणि स्लीपर घालून गेलेल्या काही तरूणांना हॉटेल प्रशासनाने आतमध्ये येऊ दिले नाही. अशा प्रकारचे कपडे हॉटेल नियमावलीत बसत नसल्याचे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आहोत त्यानूसार पोषाख परिधान करावा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये 'एजंट जॅक' हे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री विराज मुनोत, डॉ. अजित वाडीकर, असीम त्रिभुवन आणि आणखी दोन तरूण या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यातील दोघांनी हाफ पँन्ट आणि पायात स्लिपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना हॉटेल प्रशासनाने प्रवेश नाकारला. त्यांना बाहेर काढण्यात आले. या दोघांमुळे त्यांच्यासोबत असलेले सर्वच तरूण हॉटेलमधून बाहेर आले.  हे सर्व तरूण आयटी प्रोफेशनल्स असून नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. तुमच्या अंगावरील पोषाख आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या हॉटेल प्रशासन नियमावलीच्या फलकावरील 6 क्रमांकावर हे नियम लिहीले आहेत.

या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हॉटेल चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारचे नियम व्यक्तीच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहेत. त्यामुळे या प्रकरणातील हॉटेल चालकाच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. याच हॉटेलमध्ये हाफ पँन्ट, पायात स्लिपर सोबतच बॉलिवूडची गाणी वाजविता येणार नाहीत. असे अनेक अजब नियम बनविण्यात आले आहेत. 

Web Title: Half pants,sleeper do not have access to the hotel