हल्लाबोलसाठी पाच हजार मोटारसायकलची रॅली

सुदाम बिडकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पारगाव (पुणे) : राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनासाठी आंबेगाव तालुक्यातुन युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सुमारे पाच हजार मोटार सायकलची रॅली काढुन घोषणा देत आळेफाट्याकडे रवाना झाले.

आळेफाटा (ता. जुन्नर) येथे जुन्नर व आंबेगाव तालुक्यामिळुन हल्लाबोल आंदोलनानिमित्त आज मंगळवारी दुपारी तीन वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या तयारीसाठी विवेक वळसे पाटील व राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णु हिंगे यांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन जोरदार नियोजन केले होते. आज सकाळपासुन प्रत्येक गावातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या वाहनांमधून आळेफाट्याकडे रवाना होत होत्या.

युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने तालुक्याच्या पुर्वभागातील लोणी, धामणी, लाखणगाव, खडकवाडी, शिरदाळे,पोंदेवाडी,पारगाव, मेंगडेवाडी, अवसरी बुद्रुक, निरगुडसर आदी प्रमुख गावातुन युवक कार्यकर्ते मोटारसायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिरुर लोकसभा मतदार संघ युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन भोर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, युवकचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात,मयुर सरडे हेही कार्यकर्त्यांबरोबर मोटारसायकल चालवत आळेफाट्याकडे रवाना झाले प्रत्येक कार्यकर्त्याने डोक्यावर राष्ट्रवादी पक्षाची टोपी, गळ्यात पक्षाचा स्कार्फ व गाडीला राष्ट्रवादीचा झेंडा लावला होता त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर मंचर ते आळेफाटा दरम्यान सर्वत्र राष्ट्रवादीमय वातावरण तयार झाले होते. 

Web Title: hallabol bike rally five thousand bikes