हँडसॅनिटायझर हवयं? मग किराणामालाच्या दुकानात जाऊ नका कारण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षणासाठी हँडसॅनिटाझरचा वापर करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या किंमतीवरही केंद्र सरकारने नियंत्रण आणले आहे. मात्र, आतापर्यंत याची सगळ्या प्रकारच्या दुकानांमधून सहजतेने विक्री करता येत होती. मात्र, या पुढे अशा प्रकारच्या विक्रीवर ‘एफडीए‘ने बंधनी आणली आहेत.

पुणे : तुम्हाला हँडसानिटायझर आता फक्त औषधाच्या दुकानांमध्येच मिळेल. किरणामालाच्या दुकानांमधून किंवा जनरल स्टोअर्समधून याची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षणासाठी हँडसॅनिटाझरचा वापर करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या किंमतीवरही केंद्र सरकारने नियंत्रण आणले आहे. मात्र, आतापर्यंत याची सगळ्या प्रकारच्या दुकानांमधून सहजतेने विक्री करता येत होती. मात्र, या पुढे अशा प्रकारच्या विक्रीवर ‘एफडीए‘ने बंधनी आणली आहेत. याची विक्री फक्त परवानाधारक औषध दुकानांमधूनच करावी, असा आदेश ‘एफडीए‘च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी शनिवारी दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यातील कलम 30 (बी) नुसार हँड सॅनिटाझरचा समावेश औषधाच्या वर्गवारीमध्य होतो. त्यामुळे त्याची घाऊक खरेदी मान्यताप्राप्त परवानाधारकाकडून पक्क्या बिलाच्या आधारावरच करावी. तसेच, त्याची विक्री करताना किरकोळ औषध विक्रेते, परवानाधारक, शासकीय आणि खासगी रुग्णालये यांच्या मागणीनुसारच करण्याची सूचना घाऊक औषध विक्रेत्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे हँडसॅनिटायझरची विक्री किराणामाल, जनरल स्टोअर्स यांना करू नये, असेही पाटील यांनी बजावलेल्या आदेशात नमूद केले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किराणामाल किंवा जनरल स्टोअर्सला हँडसॅनिटायझरची विक्री करणाऱया औषध दुकानादाराच्या विरोधात कायद्यातील कलम 18(क) नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

रेल्वेचे आरक्षित तिकीट देतो सांगून मजुरांची फसवणूक करणाऱ्यास अटक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hand sanitizer banned at grocery store