पदवी प्रदान सोहळ्यात हातमागाचा पोशाख

Education
Education

पुणे - शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी होणाऱ्या पदवी प्रदान सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांमध्ये आता खादीपासून बनविलेले पोशाख प्रकर्षाने दिसतील. कारण देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील महत्त्वाच्या कार्यक्रमांत हातमागापासून तयार केलेले पोशाख वापरावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केले आहे. 

‘यूजीसी’च्या या आवाहनामुळे विद्यापीठांच्या पदवी प्रदान सोहळ्यातील पोशाखात नव्याने बदल होण्याची चिन्हे आहेत. आयोगाने असे आवाहन करण्याची ही पहिली वेळ नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आयोगाने विद्यापीठांच्या पदवी प्रदान कार्यक्रमांना कोणता पोशाख असावा, यासाठी कोणतेही ठोस नियम वा निर्बंध आखलेले नाहीत. मात्र २०१५मध्ये आयोगाने महत्त्वाच्या कार्यक्रमांत हातमागावर तयार केलेल्या कापडाचा वापर व्हावा, अशी सूचना केली होती. याची पुन्हा एकदा आठवण करून देणारी सूचना आयोगाने आता केली आहे.

हातमागावरचे कापड वापरल्यामुळे भारतीय असल्याचा अभिमान वाटण्याबरोबरच या उद्योगाला चालना मिळेल. देशातील हवामानाचा विचार केल्यास हातमागातून बनविलेला पोशाख सोईस्कर असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. देशातील बहुतांश विद्यापीठांमध्ये पदवी प्रदान सोहळ्यात 
ब्रिटिशांनी रूढ केलेल्या पद्धतीप्रमाणे गाऊन आणि टोपी, असा पेहराव केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यात बदल होत आहे. काही विद्यापीठांमध्ये आता पारंपरिक वेशभूषा करण्यावर भर दिला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com