ऋषिकेशच्या मदतीसाठी सरसावले हात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे ः अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या ऋषिकेश आंग्रे याची सर्व पुस्तके व घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय झाले होते. यासंदर्भात "सकाळ'मध्ये "पुराच्या पाण्याने स्वप्नच उद्‌ध्वस्त' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच त्याच्या शैक्षणिक मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. 

खडकी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी आंग्रे कुटुंबीयांची बोपोडी येथील घरी भेट घेऊन सर्वतोपरी शैक्षणिक मदत करणार असल्याचे जाहीर केले. ऋषिकेशला लागणारी सर्व प्रकारची अभियांत्रिकीची व संदर्भ पुस्तकांची यादी मागवून त्यानुसार नवीन पुस्तके देण्यात येतील, असे त्यांनी या वेळी सांगितले; तसेच सामाजिक कार्यकर्ते लाझरस जाधव यांनीही या कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्‍वासन दिले. 
घरात पाणी शिरल्याने अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडावे लागल्याने ऋषिकेश नऱ्हे येथील मित्राच्या घरी राहत असून, त्याचीच पुस्तके वापरून अभ्यास करीत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मिळालेल्या अनपेक्षित मदतीमुळे आंग्रे कुटुंबीय अतिशय भारावून गेले होते. "सकाळ'चे तसेच मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hands move to help Rushikesh