अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे : 'जय बोला हनुमान की', 'अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान', यासारख्या भक्तीपर गीतांचे कानावर पडणारे स्वर... भीमरूपी स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण... पहाटे जन्माख्यानाच्या कीर्तनानंतर सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्माचा झालेला पाळणा अन्‌ त्यानंतर भाविकांना सुंठवडा, टरबूज, कलिंगड, साखरफुटाण्यांसह महाप्रसादाचे (भोजन) वाटप करण्यात आले. 

शहर व उपनगरांतील मारुती मंदिरांमध्ये शनिवारी जन्मोत्सवामुळे पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण होते. श्रीमंत भिकारदास मारुती मंदिर, पावन मारुती मंदिर, सोट्या म्हसोबा मंदिर, खालकर चौक मारुती मंदिर (सदाशिव पेठ), दक्षिणमुखी मारुती मंदिर, बटाट्या मारुती मंदिर, सपिंड्या मारुती मंदिर, शनिवार वीर मारुती मंदिर (शनिवार पेठ), विजय मारुती मंदिर, पत्र्या मारुती मंदिर, शिंदेपार, शकुनी मारुती मंदिर (नारायण पेठ), डुल्या मारुती (गणेश पेठ), पंचमुखी हनुमान मंदिर, झुंजार मारुती मंदिर (गुरुवार पेठ), भांग्या मारुती मंदिर, सोन्या मारुती मंदिर (बुधवार पेठ), उंटाडे मारुती मंदिर (रास्ता पेठ), अकरा मारुती मंदिर (शुक्रवार पेठ) अशा विविध ठिकाणच्या मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. 

यानिमित्त मारुतीच्या मूर्ती भरजरी वस्त्रे, अलंकार, साखर गाठींनी सजविण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी मोफत अन्नदान करण्यात आले. श्रीमंत भिकारदास मारुती सेवा मंडळातर्फे भाविकांना मसाला दूध, साबुदाणा खिचडी व मूग डाळीच्या खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. 

शनिवार पेठेतल्या वीर मारुती मंडळाचे कार्यकर्ते राम दहाड म्हणाले, ''हनुमंताचे मंदिर पेशवेकालीन आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा ते अक्षय्य 

तृतियेदम्यान या ठिकाणी कीर्तन महोत्सव होतो. दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी येथे यात्रा भरते.''

Web Title: Hanuman Jayanti celebrated across Pune City