esakal | जुन्नर : उंब्रजच्या महालक्ष्मी पतसंस्थेत अपहार करणाऱ्या अध्यक्षास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर : उंब्रजच्या महालक्ष्मी पतसंस्थेत अपहार करणाऱ्या अध्यक्षास अटक

जुन्नर : उंब्रजच्या महालक्ष्मी पतसंस्थेत अपहार करणाऱ्या अध्यक्षास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळवंडी : उंब्रजच्या (ता. जुन्नर) श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेत अपहार करणाऱ्यांपैकी अध्यक्ष हनुमंत हांडे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) अटक केली. राजगुरूनगरच्या न्यायालयात मंगळवारी(१५)हनुमंत हांडे स्वतः हजर झाले होते.त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल डबडे यांनी त्यांना ताब्यात घेऊन राजगुरूनगरच्या न्यायालयात बुधवारी (ता. १६) हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती डबडे यांनी दिली.(hanumantha hande arrested for corruption in credit union)

हेही वाचा: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

सदर पतसंस्थेत संचालक मंडळ, व्यवस्थापक,अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी संगनमताने मार्च २०१७ पर्यंत ३० कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केला आहे. यातील मुख्य आरोपी अध्यक्ष हनुमान हांडे यांच्यासह ३३ लोकांवर ओतुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला असुन हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. यापुर्वी संस्थेचे सरव्यस्थापक सत्यवान बेलोटे व माजी उपाध्यक्ष रामचंद्र हांडे यांना अटक करण्यात आलेली आहे.

loading image