esakal | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार : अमोल कोल्हे
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतीमाल वाहतुकीसाठी व प्रवाशांसाठी आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यांना वरदान ठरणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी मोजणी करून द्यावी. रेल्वेमुळे कामाला मोठी चालना मिळणार आहे. शेतक-यांना विश्वासात घेऊन जमिनीच्या मोबदल्याबाबत वाटाघाटी करून समाधाकारक तोडगा काढून प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण आहे, असे शिरूर लोकसभा मतदर संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांत केवळ ५०२ रुग्ण

निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे खेड ते सिन्नर बाह्यवळण चौपदरीकरण रस्ता व हायस्पीड रेल्वे प्रकल्पबाधीत शेतक-यांच्या अडचणी समजावून घेतल्यानंतर डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गाचे शासकीय समन्वयक अभियंता दिलीप मेदगे, प्रतिनिधी महारेलचे डीजीएम सुनिल हवालदार, महारेलचे भूसंपादन विभाग जनरल मॅनेजर जयंत पिंपळकर, तहसिलदार रमा जोशी, विवेक वळसे पाटील, संतोष भोर, राजेंद्र थोरात उपस्थित होते. निघोटवाडी हद्दीत बाह्यवळण एक किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त दोन मो-या टाकलेल्या आहेत. निघोटवाडी परिसरात पडणारे पावसाचे पाणी रस्त्या लगत साचत आहे. त्यामुळे जमिन नापिक होण्याचा धोका आहे. सर्विस रस्ता दिलेला नाही. याबाबत रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटाराद्वारे पाणी ओढ्यास सोडण्याची व्यवस्था केली जाईल. रस्त्याच्या दुतर्फा रॅम्प बनवून देण्यात येईल, गावकऱ्यांचे समाधान होईल असे काम करण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा: पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे

रस्त्यात जमिनी गेल्या आहेत. बरेचशे शेतकरी भूमीहीन झालेले आहेत. अजून रेल्वेसाठी जमीन संपादन झाल्यास शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी जमिन शिल्लक राहणार नाही. निवास व बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्त्यासाठी सर्वात कमी मोबदला मिळालेला आहे. आदी समस्या सरपंच नवनाथ निघोट, शिवाजी निघोट, समीर निघोट, बाळशिराम निघोट, सुरेश निघोट, अजित निपोट, सुभाष निघोट, शामकांत निघोट, विपूल निघोट यांनी व्यक्त केल्या. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन चाकण, चांडोली, निघोटवाडी येथील प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा केली जाईल, असे दिलीप मेदगे यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे

loading image
go to top