कोकणचा राजा वाढविणार मुहूर्ताची गोडी... (व्हिडिओ)

मार्केट यार्ड - अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी आंब्यांना चांगली मागणी होती.
मार्केट यार्ड - अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी आंब्यांना चांगली मागणी होती.

पुणे - अक्षय तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत आवक कमी असल्याने ‘रत्नागिरी हापूस’चे भाव टिकून आहेत. मात्र कर्नाटक येथून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचे भाव २० ते २५ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत.

मार्केट यार्डात रविवारी रत्नागिरी येथून हापूस आंब्यांची सुमारे दहा हजार पेट्यांची आवक झाली. अक्षय तृतीया मंगळवारी (ता. ७) असल्याने ग्राहकांनी आंब्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती; परंतु मागणीच्या तुलनेत तयार आंब्यांची आवक कमी आहे. आंबा तयार होण्यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. 

आंब्याचे व्यापारी करण जाधव म्हणाले, ‘‘हापूस आंब्याची रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गणपतीपुळे, राजापूर, पावस, गोळप, मालगुंड, शिरगाव इत्यादी भागातून आवक होत आहे. ‘तुडतुडा’ नावाच्या किड्यांमुळे यंदा आंब्याची प्रत घसरली आहे.’’

कर्नाटक येथून हापूस आंब्याची १८ ते २० हजार पेट्या आणि ३ हजार क्रेट आवक झाली असल्याचे रोहन उरसळ यांनी सांगितले.

आंब्यांचे भाव
रत्नागिरी हापूस : तयार (४ ते ८ डझन) : १५०० ते ३०००, तयार (८ ते १०  डझन) : २०००  ते ३५००
कर्नाटक हापूस : (४ ते ५ डझन) ५०० ते १०००
पायरी (४ डझन) : ४०० ते ८००. - लालबाग (१ किलो) : २० ते ३०
बैंगमपल्ली/बदाम (१ किलो) : ३० ते ४०
तोतापुरी (१किलो) : २० ते ३५
मल्लिका (१ किलो) ३५ ते ४५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com