पुणेकरांनो एेकलंत का ! हापूसची चव फक्त आठ ते दहा दिवसच चाखता येणार

alphanso1.jpg
alphanso1.jpg

मार्केट यार्ड (पुणे) :  कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले असून बाजारपेठा बंद झाल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीवर पर्याय काढण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या वापरल्या जात होत्या. यंदा मार्केट यार्डातील हापूस अंबा विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी ही सोशल मीडियाचा आधार घेत आंबा विकला. परंतु, कोकणातल्या सुप्रसिद्ध हापूसचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. केवळ आठ ते दहा दिवसच हापूसची चव चाखता येणार आहे. सध्या तयार आंब्याची एक पेटी १००० ते १८०० रुपये दराने मिळत आहे.

मार्च महिन्यात खऱ्या अर्थाने हापूस बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल होतो. यंदा मात्र आंब्यांचा हंगाम उत्साहाने सुरू होणार असल्याच्या दिवसांत कोरोनाचे आगमन झाले. हे सगळ्याच क्षेत्रांना तोट्यात नेणारे होते. लॉकडाउनच्या अस्थिर काळात कोणतीच उत्पादन साखळी ही नियोजनबद्ध पद्धतीने काम करू शकत नव्हती. त्यामुळे पुणे- मुंबई यांसारख्या महानगरांतील बंद बाजारपेठांमुळे व्यापारी आणि शेतकरी घाबरून गेले होते. जे शेतकरी या परिस्थितीवर पर्याय शोधण्यास असमर्थ ठरले त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पादन वाया गेले. 

मात्र, कोरोना असताना उपजीविकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आंब्याच्या व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर करून जाहिरातींच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे काही प्रमाणात का होईना आंबा व्यवसाय करता आला. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करून जाहिरातींद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. आंबे वाया जाण्यापेक्षा योग्य दरात आंब्याची घरपोच विक्री करण्यास सुरुवात केली. ग्राहकही लॉकडाउनच्या काळात बाहेर न जाता घरपोच आंबा दिल्यामुळे खूश झाले. 
 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

४ ते ९ डझन कच्च्या आंब्याच्या एका पेटीस ८०० ते १५०० रुपये भाव मिळत आहे. तर, तयार हापूस आंब्याच्या ४ ते ९ डझनाच्या एका पेटीस १००० ते १८०० रुपये भाव मिळत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे आंब्याच्या पेट्यांची ऑर्डर घेऊन घरपोच आंबा पोहोचविला जात आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे आंबा स्वस्त झाला आहे. 

- बापू भोसले, हापूस आंबा व्यापारी, मार्केट यार्ड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com