कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

एका कोरोना रुग्णाचा मृत्यू आणि नव्याने दोन कोरोना रुग्ण आढळल्याने कोथरुडकरांची चिंता वाढली आहे. 

une-news">पुणे) : येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू आणि नव्याने दोन कोरोना रुग्ण आढळल्याने कोथरुडकरांची चिंता वाढली आहे. कोथरुडमध्ये शास्रीनगर परिसरात राहणा-या एका कोरोना बाधित वयोवृध्द महिलेचा मृत्यू दोन दिवसापूर्वी झाला. त्यानंतर वस्ती भागात राहणा-या एक गरोदर महिलेला व ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणेकरांनो, मार्केट यार्डाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

गरोदर महिला ही हडपसर भागातील असून क्वारंटाइन व्हायला सांगितले म्हणून ती कोथरुड भागात निघून आली होती. ज्येष्ठ नागरीक हा शास्रीनगर भागातीलच असून अगोदर सापडलेल्या चार रुग्णांच्या घराजवळच यांचे घर आहे. सध्या कोथरुडमध्ये पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरु केले आहे. या तपासणी अहवालात काय आढळते. याकडे कोथरुडकरांचे डोळे लागले आहेत.

 जुन्नर, जेजुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

परदेशातून कोथरुडमध्ये आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे २३ मार्चला समजले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी दुसरा रुग्ण आढळला. त्यानंतर कोथरूडमधील रूग्ण संख्या वाढू  लागली.  दरम्यान 12  मे रोजी  कोथरूड मधील वस्ती भागात प्रथमच कोरोना रूग्ण  आढळला.  दवाखान्यात असलेल्या आईला,  त्यानंतर मुलाला आणि नातवाला कोरोना असल्याचे आढळले.  या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या दुकानदार महिलेची  कोरोना तपासणी पाॅझिटीव्ह आली. अशातच रूग्णालयात दाखल असलेल्या वयोवृद्ध कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला.  आणि दोनच दिवसात याच परिसरात असलेल्या एका ज्येष्ठाची चाचणी पाॅझीटीव्ह आली. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होत होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

एकाच परिसरातील पाच जण पाॅझिटीव्ह आढळल्याने आता ही संख्या  वाढेल या चिंतेने परिसरातील नागरिक चिंतीत आहेत. 
पौडरस्त्यावर असलेल्या वस्ती भागात बाहेरून आलेली महिला पाॅझिटीव्ह असल्याचे समजल्याने आजवर रोखलेला कोरोना नियंत्रणा बाहेर जातोय की काय असे वाटू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 person affected by corona