Video : कोरोनाने नंतर मरू पण त्याआधी "या' जेवणाने... 

शितल बर्गे
शुक्रवार, 22 मे 2020

चक्क एका रुग्णाच्या जेवणात वांग्याच्या भाजीत एक आळी सापडल्याने या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

une-news">पुणे) : कोरोनाला स्वतःपासून चार हात लांब ठेवायचे. मग, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची? म्हणल्यावर सकस आहार घ्यायचा... असा सल्ला देणाऱ्या महापालिकेच्या जेवणातच "आळी' सापडली तर? मला सांगा आपण कोरोनाला रोखणार कसे? आपण तंदुरुस्त राहणार कसे? पण महापालिका आता "क्वारंनटाईन' केलेल्या लोकांना जे काही जेवण देतेय? त्यावरूनच हे सारे प्रश्न पुढे येत आहे. 

पुणेकरांनो, मार्केट यार्डाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

;

 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बालेवाडी येथील निकमार महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी चौदा दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था ही महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. पण या ठिकाणी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. चक्क एका रुग्णाच्या जेवणात वांग्याच्या भाजीत एक आळी सापडल्याने या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...

या ठिकाणच्या रुग्णांना सकाळचा चहा, नाश्‍ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा व पुन्हा रात्रीचे जेवण असा आहार दिला जातो. सगळे सुरळीत चालले असताना सेंटर मधला एक रुग्ण जेवणाचे ताटच डॉक्‍टर आणि इतर सेवकांना दाखवायला घेऊन आला. या जेवणात वांग्याच्या भाजीमध्ये चक्क आळी आढळून आली. खरेतर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी, कोरोनाला रोखण्यासाठी बाधित रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना पोषक, पुरेसे, ताजे अन्न, त्याचबरोबर स्वच्छतेची पुरेपूर खबरदारी घेऊन बनवलेले जेवण पुरवणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी हा प्रकार समोर आल्याने या सगळ्यांचाच बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या रुग्णांमध्ये अनेक लहान मुले, वृद्ध व्यक्ती, तसेच ज्यांना शुगर, डायबिटीज, हृदयाच्या तक्रारी आहेत अशा व्यक्तींचा समावेश आहे. अशा हलगर्जीपणामुळे या रुग्णांना पोटदुखी, जुलाब, उलटी यांसारखे त्रास होऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन व्यक्तींचा त्रास अजूनच वाढण्याची शक्‍यता आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे, जेणेकरून रुग्णांच्या प्रकृती वरती दिल्या जाणाऱ्या आहारामुळे कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: low quality food distributed to quarantine patients