esakal | "जाचक अटींमुळे सहकारावर गदा"
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार

"जाचक अटींमुळे सहकारावर गदा"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हडपसर : देशाच्या एकूण सहकारामध्ये केवळ महाराष्ट्र व गुजरातचे योगदान सुमारे साठ टक्के आहे. सध्या देशाचे प्रमुखपद मोदी यांच्याकडे, तर नव्याने निर्माण केलेले सहकार मंत्रिपद त्यांचेच सहकारी अमित शहा यांच्याकडे आहे. त्यामुळे ते सहकार उद्‌ध्वस्त करू शकत नाहीत. रिझर्व्ह बँक मात्र आपले जाचक नियम लादून सहकार संपवू पाहत आहे. सामान्य माणसाला सन्मान मिळवून देणारी ‘सहकार’ ही एक विचारधारा आहे. ती टिकवण्यासाठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

हेही वाचा: भोसरी एमआयडीसीमध्ये क्लोरीन गळती

येथील साधना सहकारी बँकेच्या अमनोरा पार्क येथे उभारण्यात आलेल्या प्रशासकीय मुख्य कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन, माजी खासदार विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व बँकेच्या साडेसतरानळी येथील शाखेचे स्थलांतर खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पद्मश्री डॉ. सुदाम काटे अध्यक्षस्थानी होते. चेअरमन अनिल तुपे यांनी प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, बँकेचे सुकाणू समिती सदस्य आमदार चेतन तुपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे यांच्यासह संचालक सुरेश घुले, चंद्रकांत कवडे, बबन मगर, रमेश घुले, प्रवीण तुपे, दिनकर हरपळे, सुभाष काळभोर, डॉ. सिद्राम राऊत, वंदना काळभोर, बाळासाहेब गुजर, बाळासाहेब कोळपे, राजेश कवडे, रोहिणी तुपे, शंकर बडदे, योगेश भगत, भाऊ तुपे, अविनाश पाटील, चारुचंद्र सोहोनी, संजय शेवकर आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: Pune : सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना पकडले

पवार म्हणाले, ‘‘बँकांमध्ये बाकीचे उद्योग न आणता आर्थिक आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. साधना बँकेने हे तत्त्व सांभाळले असून सहकारातील इतर संस्थांनी आदर्श घ्यावा. हा भाग राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे.’’ प्रा. नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत कापरे यांनी आभार मानले.

प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू ः अनास्कर

‘आरबीआय’च्या दृष्टीने सहकारी बँकांना व्यवहार जमत नाहीत, हा त्यांचा गैरसमज आहे. सहकार संपविण्याचे धोरण खपवून घेतले जाणार नाही. त्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू. राज्यात सहकार क्षेत्रात मोठे काम करण्यास वाव आहे, असे सहकार परिषदेचे अध्यक्ष अनास्कर म्हणाले.

loading image
go to top