Pune Crime : बालेवाडी परिसरामध्ये अश्लील चाळे करून महिलांची छेडछाड

बालेवाडी परिसरामध्ये तीन आठवड्यांमध्ये अश्लील चाळे करून महिलांची छेड काढण्याच्या तीन घटना घडल्या.
woman harassment
woman harassment esakal
Summary

बालेवाडी परिसरामध्ये तीन आठवड्यांमध्ये अश्लील चाळे करून महिलांची छेड काढण्याच्या तीन घटना घडल्या.

बालेवाडी - येथील साई चौक परिसरामध्ये अनेक महाविद्यालये, मुलींचे वसतिगृह आहेत. या परिसरामध्ये तीन आठवड्यांमध्ये अश्लील चाळे करून महिलांची छेड काढण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. काही महिला मुली समोर येऊन पोलिसांमध्ये तक्रार करतात, तर काही मात्र उगीच बदनामी नको किंवा कशाला नसती आफत म्हणून कुठेही बोलत नाहीत. पुढे निघून जातात. तरी असे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी याबाबतीत काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

बालेवाडी येथील साई चौक परिसरात अनेक महाविद्यालये, शाळा आहेत. अभियांत्रिकी तसेच एमबीएची पदवी घेण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी परगावावरून येथे येत असल्याने हा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. या भागात महाविद्यालय जास्त आहे. त्यामानाने लोकवस्ती कमी आहे. येथे सकाळी मॉर्निंग वॉक, ओपन जिम वर व्यायाम करण्यासाठी, तसेच आपल्या पाळीव कुत्र्यांना फिरवण्यासाठी अनेक महिला, मुली फिरायला येत असतात , याचाच फायदा घेत विक्षिप्त मनोवृत्तीचे लोकं असे चाळे करुन महिलांची छेड काढण्याचे प्रकार करतात.

या भागात राहणाऱ्या एका वस्तीगृहातील मुलीने एक व्यक्ती रात्रीच्या वेळी बालेवाडी रस्त्यावर तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे वर्तन करू छेड काढत असल्याचे सांगितले. तर त्यानंतर दोन तीन दिवसांनी असाच प्रकार त्याच ठिकाणी घडला. एक व्यक्ती असाच प्रकार करून मुलीची छेड काढात होता, यावेळी जवळचे तिचे कॉलेजचे मित्र असल्याने तिने लगेचच त्यांना बोलावून घेतले. या विकृत या माणसाला या मुलांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

महिलेने नाव न छापण्याच्या विनंतीवरून पुढील महिती दिली -

२४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास एक महिला तिच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी साई चौक परिसरातील एका महाविद्यालयाजवळ गेली असता, एक व्यक्ती अचानक पँट काढुन तिच्या समोर उभा राहिला. या महिलेला काय करावे काहीच सुचले नाही. त्यामुळे ती पटकन पुढे निघून गेली. मात्र ती पुन्हा परत येत असताना हा मनुष्य मॅडम माझ ऐकून तरी घ्या अस म्हणत होता. यावेळी या महिलेने पटकन मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढून घेतला. हे त्याच्या लक्षात आल्यावर कुठे काही बोलू नका, माझ करियर संपून जाईल अशी विनवणी करू लागला. ती महीला तेथून निघून सरळ घरी गेली व सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. व पोलिसात तक्रार करून या व्यक्तीचा फोटो ही पोलिसांना दिला.

तरी महापालिकेने रस्त्यांवरची जिथे पथदिवे नाहीत तेथे ते बसवावे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांकडून जनजागृतीचे कार्यक्रम, तसेच गस्त वाढविण्याची आहे.

- जयश्री बेंद्रे, बाणेर, बालेवाडी, औंध पुणे महीला मंडळ खजिनदार.

या प्रकरणात आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे काही फुटेज ताब्यात आले असून लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल.

- बालाजी पांढरे, चतुशृगी पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com