हॅरिस पुलाची दुरुस्ती लवकरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पिंपरी - जुन्या हॅरिस पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास सात ते आठ महिने लागणार आहेत. त्यामुळे या कालावधीत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी दीड ते दोन कोटींचा खर्च येणार आहे. 

सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार महापालिकेने या पुलाचे ऑडिट केले. गेल्या महिन्यात याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले. हॅरिस पुलाच्या ऑडिटमध्ये पुलावरील स्लॅब जुना झाल्याने त्याला अनेक ठिकाणी छोटे मोठे तडे गेले आहेत. दगडी बांधकामामध्ये अनेक ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे. पूल भक्‍कम अवस्थेत असला, तरी त्याच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे. 

स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये सुचविलेल्या तरतुदींनुसार पुलाची दुरुस्ती होणार आहे. पुलाचे काम जुने असल्यामुळे त्याठिकाणी काम करणे किचकट आहे. दुरुस्तीच्या काळात हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करावा लागेल. वाहतूक पोलिसांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. 
- प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका. 

Web Title: haris bridge repairing