Harishchandragad Trekking : हरिश्चंद्र गडावर ट्रेकरचा मृत्यु; इतर ट्रेकर्स सुदैवाने बचावले

पुणे परिसरातून हरिचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सहा जणांच्या ग्रुपमधील एका ट्रेकर्सचा खराब हवामानामुळे मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.
Harishchandragad trekkers
Harishchandragad trekkerssakal

ओतूर : पुणे परिसरातून हरिचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सहा जणांच्या ग्रुपमधील एका ट्रेकर्सचा खराब हवामानामुळे मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ता. २ रोजी घडली. अनिल उर्फ बाळू गीते (वय-३२, रा. लोहगाव, पुणे) असे मृत ट्रेकर्सचे नाव आहे.

गडावरील दाट धुके, कोसळणारा पाऊस, बोचरी थंडी यामुळे आजारी पडून त्याचा मृत्यु झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे गडावर ट्रेकर्सना मार्गदर्शन करणाऱ्या खिरेश्वर, ता. जुन्नर येथील बाळू रेंगडे यांनी सांगितले.

याबाबत गाईड बाळू रेंगडे यांनी सांगितले की, पुणे परिसरातून अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादु जगन भुतेकर, हरीओम विठ्ठल बोरूडे (वय-१५) व मयत अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते सर्व सध्या राहणार लोहगाव, पुणे या सहा जणांचा ग्रुप मंगळवारी दुपारी खिरेश्वर गावातून हरिचंद्र गडाकडे गेला.

दुपारी तीन वाजेदरम्यान ते तोलारखिंड पुढे गेले, मात्र नंतर खुप पाऊस व अंधारात ते वाट चुकले व भटकत राहिले. मंगळवारची रात्र त्यांनी एकत्र झाडाच्या व डोंगराच्या आश्रयाला काढली. पाऊस व थंडीमुळे गीते हे आजारी पडले होते. सकाळी सहा वाजता त्यांनी परत रस्ता शोधून मार्गस्थ झाले.

मात्र गीते यांची तब्येत खुपच खराब झाली आणि सकाळी सव्वा दहा वाजे दरम्यान गीते हे मयत झाले. त्यांनतर इतर पाच जण मृतदेह बरोबर घेऊन रस्ता पहात मदतीसाठी फिरत राहिले. त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला १४ वर्षीय हरीओम विठ्ठल बोरूडे हा ही आजारी पडला होता. मग त्यानी गीते यांच्या बॉडी बरोबर दोघे थांबून इतर दोघे हरीओमला बरोबर घेऊन मदतीसाठी फिरू लागले व थकून एक जागी निवऱ्याला बसले.

दरम्यान याच परिसरात हरिचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी आलेला मुंबईचा ग्रुप पण रस्ता चुकलेला व वेतादंड परीसरात भटकला होता. तो परतीच्या मार्गावर असताना त्याना हरीओम व इतर दिसले. त्यानी घडलेली सर्व हकिकत मुंबई ग्रुपला सांगून मदत पाठवण्याची विनंती केली.

याच दरम्यान गाईड बाळू रेंगडे हे पंढरपूर व सोलापूरच्या ट्रेकर्स घेऊन हरिचंद्र गडावरील मंदिराकडे जात होते. पुढे मुंबई ग्रुपला ते दिसले. त्यानी तुम्ही स्थानिक आहात का म्हणून विचारले व बाळू रेंगडे यांना पुण्याच्या ट्रेकर्सची माहिती दिली. गडाची चांगली माहिती असलेले बाळू यांना त्यानी सांगितल्या माहितीवरून ते कोणत्या भागात आहे हे लक्षात आले.

त्यानंतर बाळू यांनी त्यांचा शोध घेतला या परीसरात तीन वेळा त्यांनी फिरून येऊन मोठ मोठ्याने आवाज देऊन पहिले तेव्हा तिसऱ्या वेळी धुके कमी झाल्यावर त्यांच्यातील एक जण बाळू यांना दिसला. मग त्यांना आधार दिला. त्यानंतर मोबाईलवरून मित्र ओंकार ओक यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. व रेस्कुटीमला मदतीसाठी पाठवण्याची विनंती केली.

त्यानंतर परत बाळू मंदिराजवळ येऊन त्यांच्यासाठी पोहे बनवून व बिस्किट पुडे घेऊन परत त्यांच्या जवळ घेऊन गेला. रेस्कुटीम बरोबर बाळू यांचा भाऊ मारूती रांहागडे ही आला. या रेस्कु टीममध्ये ओतूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके व इतर कर्मचारी, जुन्नर रेस्कुटीम चे सदस्य आणि तीन गावकरी असे एकूण दहा जण सर्व गडावर त्यांचा शोध घेण्यासाठी गेले.

तोलारखिंडजवळ असताना बाळूचा व त्यांचा संपर्क झाला. मात्र त्यानंतर पाऊस, दाट धुके व पडत चाललेला अंधार यात गड परीसरात मोबाईल नेटवर्क ही कमी जास्त होत असल्याने त्यांचा रेस्कु टीमबरोबर संपर्क झाला नाही. मात्र कमी नेटवर्कमध्ये रेस्कुटीम आंधार व पावसामुळे परत चाललेली व उद्या शोधमोहीम करू असे बाळू यांना फोनवर कॉल लागल्यावर ऐकू आले.

त्यानंतर बाळू स्वता रेस्कु टीमच्या शोधात निघाले. कारण त्यांना इतर सर्व जरी परत गेले तरी आपला भाऊ मारूती परत जाणार नाही याची खात्री होती. त्यानंतर बाळू यांना आंधारात बॅटरीचा प्रकाश दिसला. तो त्यांच्याकडे गेला. तेव्हा त्याला भाऊ मारूती रेंगडे, तोलारखिंडवर तैनात असलेले राजूर वनविभागाचे कर्मचारी विजय नाडेकर, गौरव मेमाणे, शरद भांगले, महादु भांगरे हे भेटले. त्यांना घेऊन तो मृतदेहसह इतर जेथे होते तेथे गेला.

त्यानंतर वनविभाग व पोलीस यांच्याशी संपर्क केला असता. तुम्ही मृतदेह तेथेच सोडून सुरक्षित स्थळी राहा. असे सांगीतलेवर इतर सर्व ट्रेकर्सला सोबत घेऊन ते हरिश्चंद्रगडावरील मंदिर परिसरात असलेल्या रामनाथ बारकु भारमल यांच्या हॉटेलवर गेले तेथे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली.

गुरूवारी सकाळी राजूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी पथक येऊन त्यांनी अनिल गीते यांचा मृतदेह हरिचंद्र गडावरून खाली राजूर (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे नेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com